शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

थकीत रक्कम वसुलीसाठी शाळांचा पालकांना तगादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 12:11 IST

Washim School News शाळा सुरू झाल्याबराेबर संस्थाचालकांनी पालकांना फी भरण्याचा तगादा लावल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : काेराेना संसर्गामुळे अचानक बंद झालेल्या शाळांमुळे अनेक पालकांची आपल्या पाल्यांची शाळेची फी भरायची राहली हाेती. ही रक्कम शाळाच न झाल्याने मागितल्या जाणार नसल्याचे पालकांना वाटत असतानाच शाळा सुरू झाल्याबराेबर संस्थाचालकांनी पालकांना फी भरण्याचा तगादा लावल्याचे दिसून येत आहे.वाशिम जिल्ह्यातील पाचवी ते आठवीच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू झाल्यात. काेराेना संसर्ग पाहता शाळा बंद ठेवण्याचे प्रशासनाने आवाहन केले हाेते. त्यामुळे शाळा बंद राहिल्यात. अशावेळी शाळांनी ऑनलाइन क्लासेसवर भर देऊन विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्याचा प्रयत्न केला. काेणत्याच प्रकारची परीक्षा न हाेता विद्यार्थी पुढच्या वर्गात पाठविण्यात आले; परंतु पालकांचे म्हणणे आहे की, मुले शाळेतच गेली नाहीत व परीक्षाही घेण्यात आल्या नाहीत, तर मग पैस कसे द्यायचे; परंतु शाळा संचालक वेगवेगळया क्लृप्त्या लढवून पालकांमागे पैशांसाठी तगादा लावत असल्याचे दिसून येत आहे. संस्थाचालकांचे म्हणणे आहे की, ऑनलाइन क्लासेस घेतल्याने शिक्षकांना पगार करावाच लागला, शिवाय विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षासुद्धा घेण्यात आली. त्यामुळे शिक्षकांचे पगार केल्याने फी भरावीच लागणार आहे. नाहीतर आपल्या पाल्यांना ओळखपत्र दिले जाणार नाही. परीक्षेला बसू दिले जाणार नाही, असे सांगण्यात येत असल्याने पालकांकडे काेणत्याच प्रकारचा इलाज नसल्याने पालक नाइलाजास्तव पैसे भरताना दिसून येत आहेत. याकडे शिक्षण विभागाचे मात्र दुर्लक्ष दिसून येत आहे. अनेक पालकांचा शिक्षण संस्थाचालकांशी यावरून वादसुद्धा उद्‌भवत आहे. केवळ मुला- मुलींच्या भवितव्याचा विचार करता पालक गप्प असल्याचे एका पालकाने सांगितले, तसेच शिक्षण विभागाने यावर काहीतरी उपाययाेजना करावी व काेराेना काळातील फी न स्वीकारण्याची मागणी पालकांतून केली जात आहे.ज्या पालकांकडे गतवर्षीची पूर्णच रक्कम थकीत असेल त्यांच्याकडून काेराेनापूर्वीचीच फी आकारण्यात यावी, अशी मागणी हाेत आहे. पालक म्हणतात... कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन काळात सक्तीने फी वसूल करू नये, असे शिक्षण विभागाचे निर्देश हाेते; परंतु आता शाळा पूर्ववत झाल्याने मागच्या थकबाकी वसुलीसाठी पालकांना वेठीस धरले जात असल्याचे अनेक पालकांनी सांगितले. यावर काही तरी मार्ग काढून शिक्षण विभागाने काेराेना काळातील फी माफ करावी, अशी मागणी हाेत आहे.

शाळा चालविण्यासाठी संस्थाचालकांनाही खर्च येताेय. त्याकरिता विदयार्यांची फी माफ करण्यात आलेली नाही. पालकांना फी दयावीच लागेल परंतु शाळांकडून सक्ती करणे चुकीचे आहे. काेणत्याही पालकांनी फी भरली नाही तर त्यांच्या पाल्यांना शाळेतून कदापी काढण्यात येणार नाही. शाळांनी पालकांना टप्प्याटप्प्याने फी मागून ती वसुल करावी. याकरिता विदयार्यांना वेठीस धरणे चुकीचे असल्याने शाळांना तशा सूचना देण्यात येतील. परंतु काेणत्याही विदयार्यांचे नुकसान हाेणार नाही.- अंबादास मानकर, शिक्षणाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा