शाळांचा आढावा; अनेक शाळा बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:24 IST2021-07-24T04:24:15+5:302021-07-24T04:24:15+5:30

लसीकरणाबाबत संपर्क साधा! वाशिम : कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेण्याबाबत काही जण उदासीन असल्याचे समोर ...

School reviews; Many schools are closed | शाळांचा आढावा; अनेक शाळा बंदच

शाळांचा आढावा; अनेक शाळा बंदच

लसीकरणाबाबत संपर्क साधा!

वाशिम : कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेण्याबाबत काही जण उदासीन असल्याचे समोर येत आहे. दुसरा डोस घेण्यासाठी पात्र व्यक्तींना दूरध्वनीद्वारे संपर्क साधला जात असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

रेतीअभावी शौचालय बांधकामे प्रभावित

वाशिम : रेती उपलब्ध नसल्याने शौचालयाची बांधकामे प्रभावित होत असल्याचे दिसून येत आहे. शौचालय बांधकामासाठी रेती उपलब्ध करून देण्याची मागणी लाभार्थींमधून होत आहे.

परराज्यातील फेरी बंदच

वाशिम : कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असल्याने एसटी प्रवासी वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली आहे; परंतु अद्यापही परराज्यात बसफेरी पाठविण्याबाबत आदेशच नसल्याने वाशिम आगारातून आंध्र प्रदेशातील हैदराबाद येथे जाणारी बसफेरी बंदच आहे. त्यामुळे या बसचा आधार असलेल्या प्रवाशांची पंचाईत कायमच आहे.

Web Title: School reviews; Many schools are closed