फुकटच्या ॲपमुळे शाळांची डोकेदुखी; ऑनलाईन वर्गात होऊ शकतात मेसेज व्हायरल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:43 IST2021-08-26T04:43:35+5:302021-08-26T04:43:35+5:30

वाशिम : कोरोनामुळे शाळेतील प्रत्यक्ष शिक्षण बंद असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. दरम्यान ऑनलाईन वर्गात ...

School headaches due to free app; Messages can go viral in online classes! | फुकटच्या ॲपमुळे शाळांची डोकेदुखी; ऑनलाईन वर्गात होऊ शकतात मेसेज व्हायरल!

फुकटच्या ॲपमुळे शाळांची डोकेदुखी; ऑनलाईन वर्गात होऊ शकतात मेसेज व्हायरल!

वाशिम : कोरोनामुळे शाळेतील प्रत्यक्ष शिक्षण बंद असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. दरम्यान ऑनलाईन वर्गात राज्यातील काही जिल्ह्यांत नको ते मेसेज व्हायरल होत असल्याचे समोर येत आहे. सुदैवाने वाशिम जिल्ह्यात अद्याप अशी घटना घडली नसून, खबरदारीचा प्रयत्न म्हणून शाळा, शिक्षकांसह पालकांनीदेखील वेळीच सावध होणे गरजेचे ठरत आहे. जिल्ह्यात पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिकविण्यात येत आहे.

०००००

शाळांनी ही घ्यावी काळजी

विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गात जॉईन करून घेण्यासाठी पाठविण्यात येणारी लिंक इतर कुणालाही पाठविण्यात येऊ नये. शाळांनी त्यांच्या वर्गनिहाय अभ्यासक्रमाची लिंक ग्रुपवर शेअर करताना बाहेरील किंवा विद्यार्थ्यांचे पालक सोडून इतर कुणीही जॉईन होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. ऑनलाईन क्लास सुरू होण्याच्या काही मिनिटांपूर्वी ग्रुपवर लिंक पाठवावी किंवा शाळेच्या ॲपवर विद्यार्थ्यांचे लॉगीन व पॉसवर्डची सुविधा उपलब्ध करून या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासमध्ये जॉईन करून घ्यावे.

००००००००००

पालकांनीही दक्ष राहण्याची गरज

ऑनलाईन शिक्षणामुळे पालकांची जबाबदारी अधिकच वाढली आहे. तथापि, आपल्या मुलाच्या हातून नको ते मेसेज व्हायरल होऊ नये म्हणून पालकांनी अधिक दक्ष राहणे गरजेचे आहे. काही मुले ऑनलाईन क्लासमध्ये गेम खेळणे, कार्टून पाहणे असे उद्योगही करतात. अधूनमधून पालकांनी मुलांवर लक्ष ठेवावे.

००००००००००००

जिल्ह्यात एकही घटना नाही!

ऑनलाईन वर्गात एखाद्या मुलाकडून नको ते मेसेज व्हायरल झाल्याची जिल्ह्यात एकही घटना घडली नाही. मात्र, खबरदारीचा प्रयत्न म्हणून शाळा प्रशासन, शिक्षक यांच्यासह पालकांनीदेखील ऑनलाईन क्लास सुरू असताना मुलांवर विशेष लक्ष ठेवणे आवश्यक ठरत आहे. जिल्ह्यात जवळपास ६० हजारांवर विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचे धडे मिळत आहेत.

००००

कोट

जिल्ह्यात प्राथमिकच्या शाळा विद्यार्थ्यांसाठी बंदच आहेत. ग्रामीण भागातील कोरोनामुक्त गावात माध्यमिकच्या शाळा सुरू आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. असे शिक्षण देताना शाळा प्रशासन, शिक्षकांनी विशेष काळजी घ्यावी, अशा सूचना दिलेल्या आहेत. ऑनलाईन क्लासमध्ये नको ते मेसेज व्हायरल झाल्याची जिल्ह्यात एकही घटना घडली नाही. यासंदर्भात कुणाची तक्रार प्राप्त नाही.

- गजानन डाबेराव

उपशिक्षणाधिकारी, वाशिम

Web Title: School headaches due to free app; Messages can go viral in online classes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.