शाळकरी मुलास पळविले; अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल

By Admin | Updated: February 7, 2017 03:06 IST2017-02-07T03:06:47+5:302017-02-07T03:06:47+5:30

चिचांबा येथील घटना; विद्यार्थ्याकडे होते ‘एटीएम’

The school boy escaped; An FIR lodged on an unknown accused | शाळकरी मुलास पळविले; अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल

शाळकरी मुलास पळविले; अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल

रिसोड, दि. ६- तालुक्यातील ग्राम चिंचाबाभर येथे भारत माध्यमिक विद्यालयात इयत्ता नववीत शिकत असलेल्या १५ वर्षीय शाळकरी मुलास अज्ञात आरोपीने पळवून नेल्याची घटना ५ फेब्रुवारीला घडली. याप्रकरणी दाखल तक्रारीवरून पोलिसांनी सोमवारी अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी मुंगसाजी जाधव (रा. घोरदरी) यांनी दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे, की फिर्यादीचा मुलगा नामे राजू मुंगसाजी जाधव हा खासगी शिकवणीकरिता सकाळी ८ वाजता शिक्षकाकडे गेला होता; मात्र उशिरापर्यंत तो घरी परत आला नाही. त्याच्याकडे ह्यएटीएम कार्डह्ण देखील असून, पाहणी केली असता, तो कुठेच आढळला नाही. त्यामुळे अखेर पोलिसांत धाव घेऊन मुंगसाजी जाधव यांनी तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द कलम ३६३ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र हुंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन पांचाळ, उत्तमराव गायकवाड याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

Web Title: The school boy escaped; An FIR lodged on an unknown accused