जऊळका परिसरात शिष्यवृत्ती रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:41 IST2021-04-18T04:41:01+5:302021-04-18T04:41:01+5:30
00 नदीपात्रातून रेतीचा अवैध उपसा वाशिम : मेडशी परिसरातील नदीपात्रातून रेतीचा अवैध उपसा सुरू असल्याने शासनाचा महसूल बुडत आहे. ...

जऊळका परिसरात शिष्यवृत्ती रखडली
00
नदीपात्रातून रेतीचा अवैध उपसा
वाशिम : मेडशी परिसरातील नदीपात्रातून रेतीचा अवैध उपसा सुरू असल्याने शासनाचा महसूल बुडत आहे. जिल्ह्यात अद्याप एकाही रेतीघाटाचा लिलाव झाला नाही. तथापि, मालेगाव तालुक्यातील अनेक नदीपात्रातून रेतीची अवैध वाहतूक करण्यात येत असल्याचे दिसून येते. याकडे महसूल प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक ठरत आहे.
00
रेशन दुकानांमध्ये दरपत्रकाचा अभाव
वाशिम : तोंडगाव जिल्हा परिषद गटातील चार ते पाच गावांतील रेशन दुकानांमध्ये दर्शनी भागात दरपत्रक लावण्यात आले नाही, तसेच तक्रार पेटीदेखील ठेवण्यात आली नाही. त्यामुळे रेशन धान्याचा उपलब्ध साठा व शासकीय किमती किती, याबाबत माहिती मिळत नाही.
00
वेतनाकडे प्राथमिक शिक्षकांचे लक्ष
वाशिम : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांचे वेतन हे अनियमित झाले आहे. गत चार महिन्यांत एकदाही महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शिक्षकांचे वेतन झाले नाही. फेब्रुवारी महिन्याचे वेतन रखडले आहे. दोन दिवसांत वेतन करण्याची मागणी शिक्षकांनी शिक्षण विभागाकडे केली.