घरकुल लाभार्थींचा रिसोड बीडीओंच्या कक्षात गळफास घेवून आत्महत्येचा प्रयत्न!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 17:14 IST2018-02-22T17:11:34+5:302018-02-22T17:14:11+5:30
रिसोड (वाशिम) : गेल्या दोन वर्षांपासून सतत पाठपुरावा करूनही घरकुलांचा लाभ न मिळाल्याने संतप्त झालेल्या तालुक्यातील भापुर येथील १५ लाभार्थ्यांनी २२ फेब्रुवारीला रिसोड पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांना घेराव घातला.

घरकुल लाभार्थींचा रिसोड बीडीओंच्या कक्षात गळफास घेवून आत्महत्येचा प्रयत्न!
रिसोड (वाशिम) : गेल्या दोन वर्षांपासून सतत पाठपुरावा करूनही घरकुलांचा लाभ न मिळाल्याने संतप्त झालेल्या तालुक्यातील भापुर येथील १५ लाभार्थ्यांनी २२ फेब्रुवारीला रिसोड पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांना घेराव घातला. यादरम्यान तीन लाभार्थ्यांनी त्याठिकाणीच गळफास घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला. यामुळे पंचायत समितीत काहीकाळ चांगलाच तणाव निर्माण झाला होता.
याबाबत अधिक माहिती अशी, की भापुर येथील काही लाभार्थ्यांना २०१५-१६ मध्ये घरकुल मंजूर झाले. मात, दोन वर्षे उलटूनही त्याचा प्रत्यक्ष लाभ अद्याप मिळाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या १५ लाभार्थ्यांनी २२ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजताच्या सुमारास रिसोड पंचायत समिती गटविकास अधिकाºयांचे कार्यालय गाठून आपली कैफियत मांडली. यावेळी उद्धव जानकीराम घायाळ, आशा अशोक मवाळ आणि सुशिाला श्रीराम बोडखे या तिघांनी गटविकास अधिकाºयांच्या कक्षातच गळफास घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थित इतर नागरिकांनी वेळीच मध्यस्थी केल्याने मोठा अनर्थ टळला. पंचायत समिती पदाधिकारी सुभाष खरात, निजामपूरचे सरपंच डिगांबर जाधव यांनी संतप्त लाभार्थ्यांची समजूत घालून गटविकास अधिकाºयांशीही घरकुलांची कामे मार्गी लावण्याबाबत चर्चा केली. यादरम्यान गटविकास अधिकारी कार्यालयात चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता.