रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात औषधांचा तुटवडा

By Admin | Updated: April 21, 2017 01:21 IST2017-04-21T01:21:15+5:302017-04-21T01:21:15+5:30

रिसोड- येथील ग्रामीण रुग्णालयात अत्यावश्यक औषधी व इंजेक्शनचा तुटवडा आहे; शिवाय तज्ज्ञ डॉक्टरांचाही अनुशेष कायम आहे. परिणामी, रुग्णांना योग्य उपचार मिळण्यात गैरसोय येत आहेत.

Scarcity of medicines at Rural Hospital at Risod | रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात औषधांचा तुटवडा

रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात औषधांचा तुटवडा

शितल धांडे - रिसोड
रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात अत्यावश्यक औषधी व इंजेक्शनचा तुटवडा आहे; शिवाय तज्ज्ञ डॉक्टरांचाही अनुशेष कायम आहे. परिणामी, रुग्णांना योग्य उपचार मिळण्यात गैरसोय येत आहेत.
गत सहा महिन्यांपासून औषध निर्माता अधिकारी हे पद रिक्त असल्याने त्यांचे जागेवर इतर कर्मचाऱ्यांना बसवून औषधी वाटपाचे काम सुरु आहे. चतुर्थ श्रेणीतील एक पद रिक्त असल्याने इतर कर्मचाऱ्यांना स्वत:च्या कर्तव्याव्यतिरिक्त अतिरिक्त काम करावे लागत आहे. तीन वर्षापासून एक्सरे मशीन बंद पडल्याने क्ष -किरण कक्ष नेहमी बंद असतो. शासन दरबारी पाठपुरावा करुन एक्सरे मशीन मंजूर झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. परंतु मशीन उपलब्ध झाल्याबरोबर मशीनला आॅपरेट करणयासाठी एक्सरे तंत्रज्ञ, मदतनिस, तज्ञ डॉक्टर ही पदे भरणे गरजेचे आहे. ग्रामीण रुग्णालयात एक वैद्यकीय अधिक्षकासह दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. आज रोजी एका वैद्यकीय अधिकाऱ्यांवर संपूर्ण भार असून त्यांच्याकडेच वैद्यकीय अधिक्षकांचा प्रभार सोपविण्यात आला आहे. महत्वपूर्ण आजारांच्या उपचारासाठी लागणारी औषधींचाही तुटवडा आहे.
खोकल्यांचे औषध व अ‍ॅण्टीरॅबीज (श्वान दंश) लस गेल्या कित्येक दिवसांपासून उपलब्ध नसल्याने श्वानदंश झालेल्या रुग्णांना तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे धाव घ्यावी लागते. ग्रामीण रुग्णालय परिसरात पिण्याच्या पाण्याची सुविधा म्हणून बोअरवेल घेण्यात आला. बोअरची जलपातळी खोल गेल्याने मोजकेच पाणी येत आहे. परिणामी, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना वापरासाठी लागणारे पाणी मिळत नाही. अन्य ठिकाणावरून रुग्णांच्या नातेवाईकांना पाणी आणावे लागत आहे. रुग्णालय परिसरात असलेले शवविच्छेदन गृह मुलभूत सुविधेपासून वंचित आहे. या शवविच्छेदन गृहापर्यंत रस्ता नसल्याने रुग्णवाहिका नेता येत नाही. शवविच्छेदनासाठी आणलेले प्रेत स्ट्रेचरवर टाकुन न्यावे लागते. शवविच्छेदन गृहातील विज क नेक्शन बंद असल्याने रात्री अंधार राहतो. त्या कारणाने रात्री शवविच्छेदन होत नाही. सर्वात महत्वपूर्ण बाब म्हणजे मृतकाचे शवविच्छेदन केल्यानंतर पाणी आवश्यक असते. परंतु या ठिकाणी स्वतंत्र्य अथवा बोअरची कोणतीही सुविधा नसल्याने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना दुरवरुन पाणी आणावे लागते. याकडे जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या वरिष्ठ यंत्रणेने लक्ष देणे गरजेचे ठरत आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रातही वैद्यकीय कर्मचाऱ्यांची रिक्त पदे
४रिसोड तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेने आरोग्यविषयक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांची सुविधा निर्माण केली आहे. वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांचा अनुशेष कायम असल्याने आरोग्य सेवा देताना कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. काही आरोग्य केंद्रांमध्ये पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध नाही. कवठा प्राथमिक आरोग्य केंद्रात पिण्याच्या पाण्याची कायमस्वरुपी सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार नाही, अशी कायमस्वरुपी व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे.

वैद्यकीय अधिक्षकांसह वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. यासंदर्भात यापुर्वीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तसा प्रस्ताव सुध्दा शासनाकडे पाठविला आहे. अधिकारी, कर्मचारी व आवश्यक औषधी उपलब्ध नसल्याने आरोग्य यंत्रणेकडून काम करुन घेतांना मोठी कसरत करावी लागत आहे.
- डॉ.श्रीधर चोपडे, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय , रिसोड.

शवविच्छेदन गृहात आवश्यक लागणारी सुविधा उपलब्ध नसणे ही बाब फार गंभीर आहे. महत्वपूर्ण असलेल्या या समस्येकडे संबंधित प्रशासनाने लक्ष घालणे गरजेचे आहे. फार पुर्वीपासून याबाबत पाठपुरावा सुध्दा केला. परंतु काहीच सुधारणा झाली नाही. अनेक वेळा संबंधितांनी येथे सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आश्वासन दिले होते. परंतु त्यांनाही स्वत:च्या आश्वासनाचा विसर पडल्याचे दिसून येते. पुरेशा प्रमाणात सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे.
- डॉ.जयप्रकाश बगडे, रिसोड

Web Title: Scarcity of medicines at Rural Hospital at Risod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.