बचत गट करणार सेंंद्रीय शेतीचा प्रचार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 14:27 IST2019-11-02T14:26:48+5:302019-11-02T14:27:21+5:30
अधिकृत शॉपी टाकून सेंंद्रीय शेतीच्या प्रचारासाठी बचत गटाच्या महीला शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे.

बचत गट करणार सेंंद्रीय शेतीचा प्रचार !
वाशिम : रासायनिक शेतीमुळे शेतजमिनीची झालेली वाताहात रोखण्यासाठी मानोरा तालुक्यातील धानोरा बु.येथील संतोषी माता स्वयं सहायता बचत गट सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देणार आहे . त्यासाठी अधिकृत शॉपी टाकून सेंंद्रीय शेतीच्या प्रचारासाठी बचत गटाच्या महीला शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे.
रासायनियक शेतीमुळे शेतीचा दर्जा घसरला आहे , शिवाय रासयनिक फवारणी केल्यामुळे अनेकांना आजार नडले आहेत. घातक फवारणी केल्यामुळे वर्षभरात अनेक शेतकऱ्यांना विषबाधा झाल्याच्याही घटना घडल्यात. अतिशय माफक दरात शेती विषमुक्त व शेतीचा दर्जा बलवान करायचा असेल तर शेतकºयांनी सेंंद्रीय शेतीकडे वळले पाहीजे यासाठी तालुक्यातील धानोरा बु. येथील महींलांनी सेंद्रीय शेतीसाठी पुढाकार घेतला आहे. शेतकºयांनी आजार मुक्त व्हावे यासाठी संतोषी माता बचत गटाच्या महीलांनी धानोरा बु या छोटयाशा गावात बँकेच्या सहाय्याने सेंद्रीय खताची गावात शॉपीचे उद्घाटनच केले. यासाठी त्यांनी विदर्भ श्रेत्रीय ग्रामीण बँक शाखा मानोरा यांचे रितसर कर्ज घेतले . सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी संतोषी माता बचत गटाच्या अध्यक्षा लता गजानन लातुरकर , उमेदचे विस्तार अधिकारी बी.ए. बेलखेडकर , सपना नाचोने , सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव घाडगे , ज्योती पडळ ,ज्योती दिनेश घाडगे, ज्योती राजू पकड, रेखा विठ्ठल घाडगे, प्रभाताई मधूकर बोबडे, प्रिती किशोर घाडगे, प्रिया सुधिर चोरे, शंकुतला संजय लातुरकर, इंदू रामंचद्र पडळ, कल्पना विकास पटाळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. यावेळी उपस्थितांनी महिलांच्या उपक्रमाचे कौतूक करीत मार्गदर्शन केले.