सरपंच,सदस्यांच्या घरी शौचालये नसल्याचे उघड

By Admin | Updated: May 12, 2014 23:21 IST2014-05-12T23:04:28+5:302014-05-12T23:21:54+5:30

घरांची तपासणी केली असता सरपंचासह एकूण सहा ग्रा.पं. सदस्यांच्या घरात वैयक्तिक शौचालये नसल्याची बाब उघडकीस आली.

Sarpanch, the members do not have toilets at home | सरपंच,सदस्यांच्या घरी शौचालये नसल्याचे उघड

सरपंच,सदस्यांच्या घरी शौचालये नसल्याचे उघड

वाशिम : मालेगाव तालुक्यातील वडप येथील ग्रामपंचायत सदस्यांच्या घरी शौचालये नसल्याबाबतच्या तक्रारीवरुन जिल्हा परिषदेतील पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या पथकाने आज (दि. १२) रोजी गावाला भेट देउन प्रत्यक्ष सदस्यांच्या घरांची तपासणी केली असता सरपंचासह एकूण सहा ग्रा.पं. सदस्यांच्या घरात वैयक्तिक शौचालये नसल्याची बाब उघडकीस आली. वडप येथील सतीश नंदु गायकवाड यांनी गावातील ग्रा.पं. सदस्यांकडे वैयक्तिक शौचालये नसल्याबाबत जिल्हा पाणीपुरवठा व स्वच्छता मिशनकडे आज (दि. १२) रोजी सकाळी लेखी स्वरुपात तक्रार दाखल केली होती. सदर तक्रारीची तातडीने दखल घेउन जिल्हा पाणीपुरवठा व स्वच्छता मिशन कक्षाचे समन्वयक राजू सरतापे यांनी कक्षामधील क्षमता बांधणी तज्ज्ञ प्रफुल काळे व मनुष्य बळ विकास तज्ज्ञ शंकर आंबेकर यांच्यासह वडप गावाला भेट दिली या भेटीत या पथकाने गावातील सरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांच्या घराची तपासणी केली. या तपासणीमध्ये गावच्या सरपंच भगिरथी रमेश चंदनशिव यांच्या घरात शौचालय नसल्याचे आढळून आले. त्यांच्याप्रमाणेच भगवान गोरख बोरकर, गणेश भगवान मापारी, कमलाबाई श्रीराम चंदनशिव, अंकुश बबन गायकवाड व कल्पना रमेश गायकवाड या ग्रा.पं. सदस्यांच्याही घरी शौचालये नसल्याची बाब उघडकीस आली. त्यामुळे सदर सर्व लोकप्रतिनिधींना त्यांनी येत्या चार दिवसात घरात शौचालये बांधावीत अन्यथा त्यांच्याविरुद्ध कार्यवाही करण्यात येईल, अशा तोंडी सुचना सरतापे यांनी दिली. मालेगावचे गटविकास अधिकारी संदिप पवार यांना व ग्रामसेवकास संबंधित लोकप्रतिनिधींना चार दिवसात शौचालये बांधण्याबाबत लेखी पत्र देण्याबाबत कळविले.

Web Title: Sarpanch, the members do not have toilets at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.