अनसिंग येथील सरपंच व उपसरपंच अपात्र
By Admin | Updated: August 9, 2014 01:19 IST2014-08-09T01:12:14+5:302014-08-09T01:19:57+5:30
ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९(१) अ अन्वये सरपंच व उपसरपंच अपात्र घोषित.

अनसिंग येथील सरपंच व उपसरपंच अपात्र
अनसिंग: येथील ग्रामपंचायतचे सरपंच चिंतामण लाडगे व उपसरपंच सै.खुर्शिद अली शेर अली यांना मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९(१) अ अन्वये सरपंच व उपसरपंच राहण्यास अपात्र घोषित करण्याचे आदेश विभागीय आयुक्त, अमरावती ३१ जुलैला सुनावणी होऊन आदेश दिले आहेत.
अनसिंग येथील ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग ठाकरे, बेबी माणिक सातव, महादेव शिवराम ढोके, निता देवानंद हुरकट, खैरुनिता अब्दुल रशीद, फातीमाबी शे.रशीद या सहा ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंच चिंतामण लांडगे व इतर १६ यांच्याविरुद्ध शॉपींग सेंटरमध्ये अनाधिकृत चौकशीच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वाशिम यांचे अहवालात नमूद केल्यानुसार मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९(१) अन्वये मा.अयुक्त यांच्याकडे प्रकरण दाखल केले असता आयुक्त यांनी सुनावणी घेऊन ३१ जुलैला सरपंच चिंतामण लांडगे व उपसरपंच सै.खुर्शिदअली शेर अली यांना यापुढे राहण्यास अपात्र घोषित केले आहे. तसेच सचिव ग्रामपंचायत अनसिंग यांच्याविरुद्ध मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वाशिम यांनी शिस्तभंगाची कार्यवाही करावी, असा आदेश दिला आहे.