आसोला खुर्द येथे संत सेवालाल महाराज जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:16 IST2021-02-18T05:16:22+5:302021-02-18T05:16:22+5:30

आसोला खुर्द - बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांचा जयंती उत्सव १५ फेब्रुवारी रोजी साजरा ...

Sant Sewalal Maharaj Jayanti celebration at Asola Khurd | आसोला खुर्द येथे संत सेवालाल महाराज जयंती साजरी

आसोला खुर्द येथे संत सेवालाल महाराज जयंती साजरी

आसोला खुर्द - बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांचा जयंती उत्सव १५ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला. आसोला खुर्द येथे संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेसह बंजारा महिला तथा समाजबांधवांनी तांडा प्रदक्षिणा केली. त्यानंतर सोहमनाथ महाराज मंदिरात पूजा-अर्चा केली. यावेळी महिलांनी संत सेवालाल महाराजांची प्रार्थना म्हटली, गीते गायली. समाजबांधवांनी डफलीचा फेर धरत गीतावर नृत्य केले. यावेळी सात दिवसांपासून सुरु असलेल्या भागवत गीतेचा भाविकांनी आनंद घेतला. सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन नायक शामराव नाईक यांनी केले, यावेळी कारभारी फुलसिंग राठोड, सुभाष महाराज, मोहन नाईक, भीमराव राठोड, बाबूसिंग नाईक, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंता राठोड (मुंबई) यांनी केले.

Web Title: Sant Sewalal Maharaj Jayanti celebration at Asola Khurd