Samruddhi Mahamarg; Disadvantaged farmers get compensation! | समृद्धी महामार्ग; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार भरपाई!

समृद्धी महामार्ग; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार भरपाई!

वाशिम : राज्य रस्ते विकास महामंडळाच्यावतीने जिल्ह्यात सुरु असलेल्या मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाच्या कामांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही यापुढे पिकांची भरपाई मिळणार आहे. यासंदर्भात १४ फेब्रुवारी रोजी खासदार गवळी यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई मंत्रालयात राज्य रस्ते विकास महामंडळाची बैठक आणि याच अनुषंगाने १७ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातही बैठक घेण्यात आली.
राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने जिल्ह्यात सुरु असलेल्या मुंबई ते नागपूर समृध्दी महामार्गाचे काम करताना कारंजा तालुक्यात शेतकºयांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. या शेतकºयांना नुकसानभरपाई, अपघातामुळे मृत व अपंगत्व आलेल्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी खासदार भावना गवळी यांनी लावून धरली होती. समृध्दी महामार्गाच्या कामामुळे शेतकºयांच्या पिकांची नुकसान भरपाई व मृत आणि अपंगत्व आलेल्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळण्यासाठी सर्व संबंधित विभागाच्यावतीने पाहणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी १८ फेब्रुवारीला दिले. खासदार गवळी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीला राज्य रस्ते विकास महामंडळाचे जेएमडी ए.बी. गायकवाड, वाशिमचे उपजिल्हाधिकारी निलेश खोडके, टिम लिडर राणा प्रसाद, पीएनसी कंपनीचे संचालक सुभाष इंगळे, अधीक्षक अभियंता गजानन पळसकर आदींची उपस्थिती होती.
सदर बैठकीत नागपूर ते मुंबई राज्य महामार्गासंंबंधीत तक्रारींवर चर्चा करण्यात आली. यासंदर्भात एमएसआरडीचे ए.बी. गायकवाड यांनी समृध्दी महामागार्संबंधीत एक महिन्याचा कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले.


जिल्हाधिकारी कार्यालयातही बैठक
मुंबई येथील बैठकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार भावना गवळी व जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक यांच्या उपस्थितीत १७ फेब्रुवारीला आढावा बैठक घेण्यात आली. समृध्दी महामार्ग योजनेअंतर्गत सुरु असलेल्या रस्ते खोदकामातील धुळीमुळे लगतच्या शेतातील गोभी, टमाटे, वांगे, पालेभाज्या, तुर, हरभरा, गहु आदी पिकाचे नुकसान झाले आहे. या कामामध्ये झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू तर अनेकांना अपंगत्व आले. खासदार भावना यांच्या निर्देशानुसार सर्व विभागांनी एकत्रित पाहणी व पंचनामे करुन त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मोडक यांनी दिले. खासदार गवळी यांच्या पाठपुराव्यामुळे व जिल्हाधिकाºयांच्या आदेशामुळे लवकरच समृध्दी कामात मृत, अपंगत्व व पिकाचे नुकसान झालेल्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे.

Web Title: Samruddhi Mahamarg; Disadvantaged farmers get compensation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.