ग्रामीण गृहनिर्माण अभियंता मानधनापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:42 IST2021-09-11T04:42:52+5:302021-09-11T04:42:52+5:30

वाशिम जिल्ह्यातील कारंजा, मानोरा, वाशिम, रिसोड, मालेगाव, मानोरा येथील पंचायत समित्यांत सीएससी इ-गव्हर्नन्स सर्व्हिस संस्थेकडून ग्रामीण गृहनिर्माण अभियंता म्हणून ...

Rural Housing Engineer deprived of honorarium | ग्रामीण गृहनिर्माण अभियंता मानधनापासून वंचित

ग्रामीण गृहनिर्माण अभियंता मानधनापासून वंचित

वाशिम जिल्ह्यातील कारंजा, मानोरा, वाशिम, रिसोड, मालेगाव, मानोरा येथील पंचायत समित्यांत सीएससी इ-गव्हर्नन्स सर्व्हिस संस्थेकडून ग्रामीण गृहनिर्माण अभियंता म्हणून प्रत्येक तालुक्यात ३ किंवा कुठे २ याप्रमाणे जिल्ह्यात एकूण १९ पदे भरण्यात आलेली आहे. या सर्व अभियंत्यांना गेल्या ५ महिन्यांपासून मानधनाविना काम करावे लागत आहे. त्यामुळे यांच्या उपासमारीची वेळ आली आहे.

जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

सीएससी इ गव्हर्नन्स सर्व्हिस संस्थेकडून ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांना मानधन मागणीचा नमुना दिलेला असून, मानधनही रखडले आहे. त्यामुळे त्वरित मानधन मिळावे, अशा मागणीचे निवेदन या अभियंत्यांनी वाशिम जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहे. या पत्रावर रिसोड प्रवीण पारवे, जितेेंद्र देशमुख, अनिल आडे, ज्ञानेश्वर तुर्के, मालेगाव रितेश ददगाळ, अतित गायकवाड, अमोल बाजड, धीरज काळे, प्रणव कदम, देवेेंद्र भेलांडे, मानोरा केतन चव्हान, रामेश्वर चव्हाण, अतुल राठोड, केतन धवणे, नीतेश जाधव, आशिष ताजने, सागर देवळे, सुलभा गवई, आदी ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Rural Housing Engineer deprived of honorarium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.