वाशिम जिल्ह्यात ग्राम विद्युत  व्यवस्थापक नेमण्याची प्रक्रिया सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 16:31 IST2017-12-19T16:29:53+5:302017-12-19T16:31:38+5:30

वाशिम : जिल्ह्यातील तीन हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ६० ग्रामपंचायतींमध्ये ग्राम विद्यूत व्यवस्थापकांची नेमणूक केली जाणार आहे.

Rural Electrification Manager oppointment process begins in Washim District! | वाशिम जिल्ह्यात ग्राम विद्युत  व्यवस्थापक नेमण्याची प्रक्रिया सुरू!

वाशिम जिल्ह्यात ग्राम विद्युत  व्यवस्थापक नेमण्याची प्रक्रिया सुरू!

ठळक मुद्देतीन हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ६० ग्रामपंचायतींमध्ये ग्राम विद्यूत व्यवस्थापकांची नेमणूक केली जाणार आहे. संबंधित उमेदवाराला महावितरणकडून तीन महिन्यांचे विद्युत हाताळणी, दुरुस्तीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. आयटीआय’मार्फत वीजतंत्रीचा अभ्यासक्रम पूर्ण करणाºया उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले असून ते सादर करण्यासाठी संबंधितांची धावपळ सुरू आहे.


वाशिम : जिल्ह्यातील तीन हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ६० ग्रामपंचायतींमध्ये ग्राम विद्यूत व्यवस्थापकांची नेमणूक केली जाणार आहे. ग्रामपंचायतीमार्फत स्थानिक आयटीआयअंतर्गत वीजतंत्री पात्रताधारक उमेदवारांच्या नावाची शिफारस घेऊन ही नेमणूक होणार असून यासंदर्भातील प्रक्रिया सद्या जोरात सुरू आहे. 
ग्रामीण भागातील वीज समस्या दूर करण्यासाठी त्या-त्या गावातील पात्रताधारक व्यक्तीची नेमणूक करण्यासाठी ग्राम विद्युत व्यवस्थापक नेमणुकीचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामपंचायतीने नावाची शिफारस केल्यानंतर संबंधित उमेदवाराला महावितरणकडून तीन महिन्यांचे विद्युत हाताळणी, दुरुस्तीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर त्याची ग्राम विद्युत व्यवस्थापक म्हणून नेमणूक केली जाईल. त्यानुसार, गेल्या १५ दिवसांपासून ३ हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांमधील ‘आयटीआय’मार्फत वीजतंत्रीचा अभ्यासक्रम पूर्ण करणाºया उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले असून ते सादर करण्यासाठी संबंधितांची धावपळ सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Rural Electrification Manager oppointment process begins in Washim District!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.