राज्यभरात ग्रामीण कृषी हवामान सेवा
By Admin | Updated: May 14, 2014 00:28 IST2014-05-14T00:12:51+5:302014-05-14T00:28:22+5:30
ग्रामीण कृषी हवामान सेवेच्या माध्यमातुन शेतकर्यांना स्थानिक हवामानाचा अचुक अंदाज मिळविता येणार आहे.

राज्यभरात ग्रामीण कृषी हवामान सेवा
वाशिम: हवामानातील अचानक बदलामुळे निसर्गावर अवलंबून असणार्या शेतकर्यांचे नुकसान टाळण्याच्या महत्वाकांक्षी हेतूने हवामान विभागाने ग्रामीण कृषी हवामान सेवा हा कार्यक्रम हाती घेतला आहे. यामध्ये शेतकर्यांना स्थानिक हवामानाचा अचुक अंदाज मिळविता येणार आहे. राज्यातील कृषी विद्यापीठे, महाविद्यालये, कृषी विज्ञान केंद्रांच्या मदतीने राबविण्यात येणार्या या योजनेतून शेतकर्यांना हवामानाची स्थिती, पिकांवर होणारा परिणाम, रोग व किडींचे नियंत्रण याबाबतची माहिती मोबाईलवर मिळणार आहे. शेतीविषयक हवामान अंदाज जास्तीत जास्त शेतकर्यांपयर्ंत परिणामकारक पोहोचावा, यासाठी कराव्या लागणार्या आवश्यक बदलाविषयी चर्चा करण्यासाठी हवामान प्रशिक्षण संस्थेतर्फे बोलविण्यात आलेल्या चर्चासत्रात प्रसारमाध्यमे, कृषी विषयक सेवा देणार्र्या मोबाईल कंपन्या व संस्थांनी शेतकर्यांना स्थानिक स्तरावर लहान क्षेत्रासाठीचा हवामान अंदाज अचूकपणे कमी वेळेत मिळावा, माहिती सुस्पष्ट असावी, अशी मते नोंदवून बदल सुचविले होते.