रानडुकराचा धुमाकूळ
By Admin | Updated: July 19, 2014 01:06 IST2014-07-19T00:44:43+5:302014-07-19T01:06:51+5:30
पोहा येथील घटना: आठ जणांवर प्राणघातक हल्ला , नागरिक भयभीत.

रानडुकराचा धुमाकूळ
पोहा : येथील बंजारा तांड्यात १८ जुलैच्या सकाळी रानडुकराने धुमाकूळ घालून ८ जणांवर प्राणघातक हल्ला केला. त्यामुळे गावकर्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
येथील किरण मधुकर राठोड हा २0 वर्षीय तरूण आपल्या घरासमोर उभा अस ताना त्याच्यावर सकाळी ६ च्या सुमारास आकस्मिकपणे रानडुकराने हल्ला केला. ज्यामध्ये त्याच्या डाव्या पायाला ईजा झाली. दरम्यान, त्याला वाचविण्यासाठी आलेले दिपला रायसिंग राठोड (वय ५५) यांनाही रानडुकराने चावा घेतला. मोठय़ा संख्येने गावकरी धावून आल्याने रानडुकराने येथून पळ काढला व थोड्या दूर अंतरावर असलेल्या प्रातविधीसाठी जाणार्या मारोती बापुराव धोत्रे (वय ४0) यांच्यावर हल्ला चढविला. रानडुकराने त्यांच्या उजव्या हाताला व गुप्तांगाजवळ जबर चावा घेतला. त्यामुळे ते गंभीरपणे जखमी झाले. तसेच परसराम सीताराम कुर्हाडे (वय ४0) हे सुद्धा प्रात:विधीसाठी जात असताना त्यांच्या अंगावर रानडुकर धावून गेले. ज्यामध्ये त्यांच्या उजव्या हाताच्या बोटाला जखमी होवून बोट फ्रॅक्चर झाले तसेच त्यांच्या पाठीला, कमरेला व दोन्ही पायाला ईजा झाली. त्यांनी आरडाओरड केल्याने लगेच असंख्य नागरिक घटनास्थळाकडे धावले. त्यामुळे रानडुकराने पळ काढला.
रानडुकराने चक्क गावातील महादेव मसने (वय ५५) यांच्या घरात घुसून त्यांचेवर हल्ला केला. तसेच प्रविण लक्ष्मण राठोड (वय ३८), रामू जाधव यांच्यावरही रानडुक्कर ओळीने धावून गेल्याने त्यांच्या कान व हाताला ईजा झाली.
दरम्यान, सर्व जखमींना गावकर्यांच्या मदतीने येथील प्राथमिक आरोग्य केन्द्रात उ पचारार्थ आणण्यात आले. वैद्यकीय अधिकारी शरद दहातोन्डे यांनी जखमींवर प्र थमोपचार करून कारंजा ग्रामीण रूग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. रानडुकराने ओळीने आठ जणांवर प्राणघातक हल्ला केल्याने गावकर्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.