शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

आरटीई : पाल्यांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी पालक उदासिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 11:04 AM

Right To Education पाल्यांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी अनेक पालक उदासिन असल्याचे दिसून येते.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आरटीई (राईट टू एज्युकेशन) अंतर्गत लॉटरी पद्धतीतून निवड झालेल्या पाल्यांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी अनेक पालक उदासिन असल्याचे दिसून येते. वारंवार मुदतवाढ मिळूनही अद्याप ३६९ पालकांनी आपल्या पाल्याचे आवश्यक ते कागदपत्रे सादर केली नाहीत. आरटीई अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागासवर्गीय, दिव्यांग प्रवर्गातील पात्र बालकांना इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत पहिल्या वर्गात एकूण प्रवेशित संख्येपैकी २५ टक्के मोफत प्रवेश दिले जातात. यावर्षी कोरोना विषाणू संसर्गामुळे मोफत प्रवेश प्रक्रियादेखील प्रभावित झाली. पहिल्या लॉटरी पद्धतीत वाशिम जिल्ह्यातील ९७६ बालकांची निवड झाली.  निवड झालेल्या बालकांना प्रवेश घेण्यासाठी वारंवार मुदतवाढ दिली होती. ही मुदत संपल्यानंतर ३० सप्टेंबरपासून प्रतीक्षा यादीतील बालकांना मोफत प्रवेशाची संधी दिली जात आहे. २३ ऑक्टोबरपर्यंत या बालकांना मोफत प्रवेशासाठी कागदपत्रे ही संबंधित शाळेत दाखल करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील ९७६ पैकी आतापर्यंत ६०७ बालकांनी प्रवेश घेतले आहेत. उर्वरीत ३६९ बालकांचे अद्याप प्रवेश झाले नाहीत. 

आर्थिक दृृष्ट्या दूर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शालेय प्रवेशासाठी २५ टक्के आरक्षण आहे. पहिल्या लाॅटरी पद्धतीत जिल्ह्यातील ९७६ बालकांची निवड झाली. कागदपत्रे सादर केल्याने आतापर्यंत ६०७ बालकांचे प्रवेश निश्चित झाले. उर्वरीत पालकांनी २३ ऑक्टोबरपर्यंत कागदपत्रे सादर करावी. खोटा उत्पन्नाचा दाखला आणि शाळेजवळील बनावट रहिवासी प्रमाणपत्र दाखल करुन प्रवेश मिळविला जात असल्याची एकही तक्रार शिक्षण विभागाकडे आली नाही.- अंबादास मानकर शिक्षणाधिकारी, (प्राथमिक) जिल्हा परिषद वाशिम.

टॅग्स :washimवाशिमRight To Educationशिक्षण हक्क कायदा