सोयाबिनच्या २०० रुपये अनुदानाचे २२ लाख रुपये पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 17:45 IST2018-08-29T17:45:31+5:302018-08-29T17:45:36+5:30
वाशिम : आॅक्टोबर ते डिसेंबर २०१६ या कालावधीत कृषि उत्पन्न बाजार समित्यांकडे सोयाबिन विकणाºया शेतकºयांना प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान वाटपासाठी जिल्ह्याला १४ कोटी ७९ लाख रुपये मंजूर झाले होते.

सोयाबिनच्या २०० रुपये अनुदानाचे २२ लाख रुपये पडून
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : आॅक्टोबर ते डिसेंबर २०१६ या कालावधीत कृषि उत्पन्न बाजार समित्यांकडे सोयाबिन विकणाºया शेतकºयांना प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान वाटपासाठी जिल्ह्याला १४ कोटी ७९ लाख रुपये मंजूर झाले होते. मात्र, अद्याप काही शेतकºयांनी आवश्यक पुरावे सादर न केल्याने त्यातील २२ लाख रुपये अनुदान विनावाटप पडून आहे. दरम्यान, आगामी महिनाभरात शेतकºयांकडून प्रतिसाद न मिळाल्यास सदर रक्कम शासनाकडे परत पाठविली जाईल, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी दिली.
शासनाकडून शेतकºयांना वाटप करण्यासाठी आलेली १४.७९ कोटी रुपयांची रक्कम त्या-त्या कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. दरम्यान, आॅक्टोबर ते डिसेंबर २०१६ या कालावधीत बाजार समित्यांमध्ये सोयाबिनची विक्री करणाºया शेतकºयांकडून बँक खाते क्रमांक, आधारकार्ड यासह आवश्यक माहिती मागविण्यात आली होती. सुमारे ९६ टक्के शेतकºयांनी त्यानुसार माहिती सादर केल्याने संबंधितांना देय अनुदान त्यांच्या आधार लिंक असलेल्या खात्यांमध्ये जमा करण्यात आले. मात्र, ४ टक्के शेतकºयांचा वारंवार ‘फॉलोअप’ घेवून देखील त्यांच्याकडून कुठलाच प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे आणखी महिनाभराची मुदत संबंधितांना देण्यात आली असून याऊपरही संबंधित शेतकºयांकडून प्रतिसाद मिळाला नाही तर २२ लाख रुपयांची शिल्लक असलेली रक्कम शासनाकडे परत पाठविण्याची कार्यवाही केली जाईल, असे जिल्हा उपनिबंधक कटके यांनी सांगितले.