शेत जमीन पिकांसह रस्ता वाहून गेला, पूलही खचला; इंझोरीत परतीच्या पावसाचे तांडव

By दादाराव गायकवाड | Published: October 6, 2022 10:53 AM2022-10-06T10:53:31+5:302022-10-06T10:54:27+5:30

हजारो हेक्टरमधील पिके नेस्तनाबूत

Roads scraped with farm land crops bridges collapsed Rainstorm | शेत जमीन पिकांसह रस्ता वाहून गेला, पूलही खचला; इंझोरीत परतीच्या पावसाचे तांडव

शेत जमीन पिकांसह रस्ता वाहून गेला, पूलही खचला; इंझोरीत परतीच्या पावसाचे तांडव

Next

वाशिम (दादाराव गायकवाड): खरीप हंगामातील पिके काढणीवर असतानाच पुन्हा एकदा परतीच्या पावसाने तांडव सुरू केले आहे. बुधवारी रात्री ९. ०० वाजतापासून सुरू झालेल्या पावसाने धुमाकूळ घातल्याने शेती पिकांसह रस्ता आणि पुलही खचला. या पावसामुळे हजारो हेक्टर मधील पिके नसताना शेतकरी पुन्हा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

इंझोरी परिसरात बुधवारी सायंकाळी सात वाजता नंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले. नऊ वाजता पासून अचानक विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात रात्रभर पाऊस धो-धो कोसळत राहिला. त्यामुळे कारंजा मानोरा मार्गावरील बहुतांश भागाच्या कडा खचल्याने रस्ता संकटमय झाला. याच मार्गावरील पुलही खचला, शिवाय हजारो हेक्टरमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने जमिनीसह पिके खरडून गेली. त्यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. धो-धो पावसामुळे पिके खरडल्याने आता शेतकऱ्यांना उत्पन्नाची कुठलीही आशा राहिली नाही. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पीक नुकसानाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी शासनाकडे मागणी करावी, अशी याचना इंझोरी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे. 

शेकडो शेतकऱ्यांचे मोटारपंपही गेले वाहून
इंझोरी परिसरात बुधवारी रात्रीपासून गुरुवार सकाळपर्यंत कोसळलेल्या धो-धो पावसामुळे शेकडो शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी झाले. शेतात पूर सदृश स्थिती निर्माण झाली त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील मोटार पंपही त्यात वाहून गेले आहेत. 

जनरेटरवर उघडावे लागले अडाण धरणाचे दरवाजे
इंझोरीरी परिसरात बुधवारी रात्री धो धो पाऊस सुरू झाल्याने अडाण धरणात १०० टक्क्यांच्यावर जलसाठा तयार झाला. यामुळे त्यांना धरणाला धोका असताना धरणाचे दरवाजे उघडण्याची तातडीने गरज निर्माण झाली‌ तथापि, वीज पुरवठा खंडित झाल्याने पाटबंधारे विभागासमोर मोठी अडचण निर्माण झाली. अशात पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांनी समय सूचकता राखून रात्रीच जनरेटर उपलब्ध करीत धरणाचे दरवाजे उघडले. सद्यस्थितीत या धरणाचे पाचही दरवाजे उघडले असून त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

Web Title: Roads scraped with farm land crops bridges collapsed Rainstorm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.