ग्रामसडक योजनेतील रस्ता काम संथगतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:44 IST2021-01-13T05:44:54+5:302021-01-13T05:44:54+5:30
बाभुळगाव येथील ग्रामस्थ वैतागले बाभूळगाव या गावाला शहराशी जोडणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली होती. त्यामुळे या रस्त्यावरून वाहने ...

ग्रामसडक योजनेतील रस्ता काम संथगतीने
बाभुळगाव येथील ग्रामस्थ वैतागले
बाभूळगाव या गावाला शहराशी जोडणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली होती. त्यामुळे या रस्त्यावरून वाहने चालविताना चालकांना कसरत करावी लागत होती. ग्रामस्थांना उघड्या पडलेल्या खडीवरून ये-जा करणेही कठीण झाले होते. त्यामुळे या रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी ग्रामस्थ व चालकांकडून करण्यात येत होती. अखेर काही महिन्यांपूर्वी ग्रामसडक योजनेतून या रस्त्याचे काम सुरू झाले. त्यासाठी खडीकरणाची प्रक्रियाही करण्यात आली; परंतु डांबरीकरणाच्या कामाला विलंब लागत असल्याने खडी मोकळी होऊन निघत असल्याने रस्त्याची पुन्हा दैना होत आहे. यात जागोजागी खड्डे पडत असल्याने चालकांना वाहन चालविताना त्रास होत आहे. संबंधित विभागाने या रस्ता कामाची पाहणी करून कंत्राटदाराला कामाला गती देण्यासह ते दर्जेदार करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी बाभुळगाव येथील ग्रामस्थ भाऊराव नवघरे, योगेश ढोबळे, मोतीराम हांबरे, भागवत ढोबळे, संतोष नवघरे आदींनी केली आहे.
===Photopath===
110121\11wsm_3_11012021_35.jpg
===Caption===
ग्रामसडक योजनेतील रस्ता काम संथगतीने