एका वर्षातच रस्ता उखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:41 IST2021-07-29T04:41:41+5:302021-07-29T04:41:41+5:30

प्रभाग क्रमांक १२ मध्ये पेवर ब्लॉकचा रस्ता बनवण्यात आला. हा रस्ता अंदाजपत्रकानुसार बनवला गेला नाही, असा आरोप या ...

The road was paved within a year | एका वर्षातच रस्ता उखडला

एका वर्षातच रस्ता उखडला

प्रभाग क्रमांक १२ मध्ये पेवर ब्लॉकचा रस्ता बनवण्यात आला. हा रस्ता अंदाजपत्रकानुसार बनवला गेला नाही, असा आरोप या भागातील नागरिक करीत आहेत. निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्यामुळे रस्ता एका वर्षाच्या आतच उखडला आहे. याबाबत

२६ जुलै २०१९ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, नगरपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय यांना सुद्धा स्मरण पत्र दिले. मात्र, दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यानंतर २९ ऑक्टोबर २०२० ला सुद्धा तक्रार केली, २ जानेवारी २०२१ रोजी मासिक सभेत ठराव घेतला. तरीही हा रस्ता दुरुस्त केला नाही, असा आरोप नागरिकांनी केला. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

280721\img-20210727-wa0058.jpg

निघालेले पेव्हर ब्लँक

Web Title: The road was paved within a year