कारंजात पोलिसांसह आर.सी.एफ जवानांचे पथसंचालन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 14:42 IST2018-07-21T14:41:59+5:302018-07-21T14:42:45+5:30
वाशिम जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनात कारंजात पोलिसांसह आर सी एफ जवानांनी पथसंचालन केले.

कारंजात पोलिसांसह आर.सी.एफ जवानांचे पथसंचालन
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड : आगामी सण उत्सवाच्या कार्यकाळात शहरात शांतता व सुव्यवस्था रहावी या उद्देशाने वाशिम जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनात कारंजात पोलिसांसह आर सी एफ जवानांनी पथसंचालन केले.
यामध्ये ६५ आर.सी.एफ चे जवान, पोलीस उपविभागीय अधिकारी, २ पोलीस निरिक्षक, ८० पोलिस अधिकारी, पोलिस अशा एकुण १६५ जणांनी सहभाग घेतला. कारंजा शहरात आगामी गणपती व दुर्गा विसर्जन तसेच इतर सणांच्या निमित्ताने मिरवणूक विसर्जन मार्गात मिश्र वस्तीतून पथसंचालन करण्यात आले. यावेळी पोलिस उपविभागीय अधिकारी रमेश सोनुने, कारंजा शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार एम एम बोडखे, कारंजा ग्रामीणचे ठाणेदार गजानन गुल्हाणे, यांच्यासहीत पोलिस कर्मचाºयांची उपस्थिती होती.