रिसोड नगर परिषद निवडणुकीत भारिप-बमसंची स्वबळाची हाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 13:12 IST2018-11-05T13:12:25+5:302018-11-05T13:12:57+5:30
रिसोड (वाशिम) : आगामी रिसोड नगर परिषद निवडणुकीत भारिप-बमसं स्वबळावर लढणार असून, तशी घोषणा जिल्हाध्यक्ष युसूफ पुंजानी यांनी रविवारी रिसोड येथील आढावा बैठकीत केली.

रिसोड नगर परिषद निवडणुकीत भारिप-बमसंची स्वबळाची हाक
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड (वाशिम) : आगामी रिसोड नगर परिषद निवडणुकीत भारिप-बमसं स्वबळावर लढणार असून, तशी घोषणा जिल्हाध्यक्ष युसूफ पुंजानी यांनी रविवारी रिसोड येथील आढावा बैठकीत केली. यामुळे नगर परिषदेत तिरंगी, चौरंगी लढत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
रविवार, ४ नोव्हेंबर रोजी भारिप-बमसंच्या स्थानिक कार्यालयात आगामी निवडणूक व पक्षाची भूमिका यासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी प्रदेश महासचिव तथा जिल्हाध्यक्ष युसूफ पुंजानी, जिल्हा महासचिव डॉ. नरेश इंगळे, हिंगोली जिल्हा निरीक्षक डॉ. रवींद्र मोरे पाटील, प्रा. प्रशांत गोळे, सोनाजी इंगळे, ख्वाजा भाई, शहराध्यक्ष प्रदीप खंडारे, तालुकाध्यक्ष सभादिंडे, दिलीप नवघरे, चंदन राठोड, हरिदास बनसोड, जिल्हा महिला आघाडी प्रमिला शेवाळे, मुनिरभाई, वसीम पठाण, मुन्ना भाई, गिरीधर शेजुळ, डाखोरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी नगराध्यक्ष पदासह १० प्रभागामध्येही भारिप-बमसंने वंचित बहुजन घटकांना सोबत घेऊन स्वबळावर निवडणूक लढवावी, असा सूर पदाधिकारी, कार्यकर्त्यांमधून निघाला. या पृष्ठभूमीवर नगराध्यक्ष पदासह १० प्रभागामध्ये भारिप-बमसं स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचे जिल्हाध्यक्ष पुंजानी यांनी जाहिर केले.