रिसोडचा सौरभ हरीमकर १६ वर्षाखालील विदर्भ क्रिकेट संघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 14:40 IST2017-12-21T14:37:50+5:302017-12-21T14:40:43+5:30
रिसोड: शहरातील मयूर तायडे क्रिकेट अकॅडमीचा खेळाडू सौरभ हरीमकर याची १६ वर्षाखालील विदर्भ क्रिकेट संघात निवड झाली आहे.

रिसोडचा सौरभ हरीमकर १६ वर्षाखालील विदर्भ क्रिकेट संघात
रिसोड: शहरातील मयूर तायडे क्रिकेट अकॅडमीचा खेळाडू सौरभ हरीमकर याची १६ वर्षाखालील विदर्भ क्रिकेट संघात निवड झाली आहे.
विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्यावतीने निवड चाचणी सराव सामने खेळविण्यात आले होते. त्यामधे रिसोडचा सौरभ हरीमकर याने चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले. त्यामुळे त्याची विदर्भ क्रिकेट संघाच्या १५ खेळाडू मध्ये निवड झाली. हा संघ हैदराबाद (विजयवाडा) येथे सरावासाठी
गेला होता. त्यामधे सौरभचे चांगले प्रदर्शन दिसले. त्यानंतर विजय मर्चंट ट्रॉफी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी विदर्भ क्रिकेट असोसिएशन च्या २५ खेळाडूंच्या शिबिरात सौरभ चि निवड झाली. त्यामधे सराव सामने खेळवण्यात आले. त्यामधे शिबिरात आणि सामन्यात सौरभने चमकदार प्रदर्शन करत विदर्भ संघात जागा मिळवली.सौरभ हरीमकर हा पीएचसीए क्रिकेट अकादमी नागपुर चे प्रशिक्षक मयूर तायडे यांच्याकडे नियमित सराव करतो.