वाशिमचा ऋषभ छाबडा राष्ट्रीय स्तरावर
By Admin | Updated: June 28, 2014 01:40 IST2014-06-28T01:04:08+5:302014-06-28T01:40:37+5:30
शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते सन्मानित.

वाशिमचा ऋषभ छाबडा राष्ट्रीय स्तरावर
वाशिम : इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ टेकनॉलॉजी या प्रतिष्ठित आयटीआय परिक्षेत अखिल भारतीय स्तरावर यश मिळवून रिषभ जितेंद्र छाबडा याने राष्ट्रीय स्तरावर वाशिमचे नाव झळकविले. भारतातील जागतिक दर्जाच्या महाविद्यालयात प्रवेश मिळविणार्या रिषभ छाबडा याच्या शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी सत्कार करुन त्याला सन्मानित केले.
अतिशय कठीण व उच्चश्रेणीच्या स्पर्धात्मक परिक्षेत आपल्या जिद्द व चिकाटीने यश मिळविणार्या रिषभ छाबडाने एआयपीएमटी परीक्षेत यशस्वी ठरणार्या सुमित हरिष बाहेती नंतर छाबडा परिवारासह वाशिम शहराचे नावलौकिक केले.शहरातील कुसूम शॉपी व छाबडा पेट्रोल पंपाचे संचालक जितेंद्र छाबडा यांचा मुलगा रिषभ याने इयत्ता बारावीच्या परीक्षेत ९0.१५ टक्के गुण मिळविले असून आयआयटी जेईई या अँडव्हॉन्स परीक्षेत संपूर्ण भार तातून ४८२३ वी रँक मिळविले. यासोबत त्याने बिटस ऑफ पिलानीच्या प्रवेशपूर्व परीक्षेत ३४६ गुण मिळवून व्हीआटी विद्यापीठाच्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत सुद्धा अखिल भारतीय स्तरावर ७३२ वी रँक मिळविण्यात यशस्वी ठरला आहे. शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते सन्मान मिळविणार्या रिषभ छाबडा याने कॉम्प्युटर सायन्स किंवा इलेक्ट्रीकल इंजिनियरिंगची पदवी प्राप्त करुन स्वत:चा उद्योग सुरु करण्याची इच्छा व्यक्त केली. क्रिकेट खेळासह वाचनाची आवड जोपासणार्या रिषभला औरंगाबाद गुरुकुलच्या शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले. मामा संजय पापडीवाल, मामी अंजली पा पडीवाल, वडील जितेंद्र छाबडा, आई संगीता छाबडा, काका मंडळी व मित्रांच्या पाठबळामुळे यशापर्यंत पोहोचता आले असे रिषभने नमूद केले.