शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
2
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
3
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
4
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
5
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
6
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
7
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
8
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
9
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
10
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
11
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
12
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
13
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
14
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
15
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
16
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...
17
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
RR ला मोठा धक्का; स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार, Play Off ची जागा पक्की होण्यापूर्वी झटका
20
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प

बंडखोरी भोवली : अनंतराव देशमुख काँग्रेसमधून निष्कासित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 1:37 PM

त्यांनी भाजपाशी सलगी करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यामध्येही त्यांना यश न आल्याने शेवटच्या क्षणी त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : रिसोड विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराविरुध्दात निवडणूक रिंगणात उडी घेऊन बंडखोरी केल्याने काँग्रेसचे जेष्ठ नेते अनंतराव देशमुख यांना पक्षातून निष्कासित करण्यात आले आहे. यासंदर्भात महाराष्टÑ प्रदेश काँग्रेस कमेटीचे सरचिटणीस अ‍ॅड. गणेश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दुजोरा दिला.वाशिम जिल्हयात काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी खासदार अनंतराव देशमुख म्हणून परिचित आहेत. अनंतराव देशमुख पक्षापासून नाराज असल्याचे सर्वश्रृत होते. त्यांनी गत विधानसभा निवडणुकीकरिता सुध्दा पक्षाकडे रिसोड विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी मागितली होती. तेव्हा त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. उमेदवारी नाकारल्याने अनंतराव देशमुख दुसऱ्या पक्षाच्या शोधात होते, तसे त्यांनी प्रयत्नही केलेत. ही बाब पक्षश्रेष्ठींना सुध्दा माहित झाल्याने त्यांची नाराजी दूर करण्यासाठी लोकसभा निवडणुकीत लोकसभा मतदारसंघ अकोल्याची धुरा त्यांच्याकडे सोपविण्यात आली होती. अकोला लोकसभेचे उमेदवार हिदायत पटेल यांच्यासोबत त्यावेळी ते होते. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून रिसोड मतदारसंघासाठी आपला विचार होईल असे त्यांना वाटत होते. त्यांनी पक्षातील नेत्यांशी संपर्क ही केला, परंतु पक्षाकडून आपला विचार होत नाही याची कल्पना त्यांना झाल्याने त्यांनी भाजपाशी सलगी करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यामध्येही त्यांना यश न आल्याने अखेर शेवटच्या क्षणी त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे त्यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या आदेशान्वये निष्कासीत करण्यात आले असल्याची माहिती महाराष्टÑ प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अ‍ॅड. गणेश पाटील यांनी दिली. आपल्याकडे पक्षाचे कोणते महत्वाचे पद नाही. आपण गत काही वर्षापासून पक्षात कार्यरतही नाही त्यामुळे आपल्याला निष्कासित करण्याचा प्रश्नच उदभवत नाही. या कार्यवाहीची आपल्याला काही कल्पना सुध्दा नाही.- अनंतराव देशमुखअपक्ष उमेदवार, रिसोड

काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी केल्याने पक्षाच्यावतिने त्यांचे सदस्य पद रद्द करुन त्यांना पक्षातून निष्कासीत करण्यात आले आहे. याची कल्पना जिल्हाध्यक्षांना सुध्दा सकाळीच देण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांवर ही कारवाई आहे.- अ‍ॅड. गणेश पाटीलसरचिटणीस, महाराष्टÑ प्रदेश काँग्रेस कमिटी

अनंतराव देशमुखांना निष्कासीत केले असल्याची आपल्याला कल्पना नाही. काल निष्कासित केले असल्यास आज आपल्याला फॅक्सव्दारे माहिती देण्यात येणार आहे. तुर्तास याची कल्पना आपल्याला नाही.- अ‍ॅड. दिलीपराव सरनाईकजिल्हाध्यक्ष, काँग्रेस कमिटी वाशिम

टॅग्स :washimवाशिमrisod-acरिसोडAnantrao Deshmukhअनंतराव देशमुखDilip Sarnaikदिलीप सरनाईकMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019