दुसºया दिवशीही महसूल विभागाचे कामकाज ठप्प !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 16:03 IST2017-10-11T16:02:57+5:302017-10-11T16:03:56+5:30

Revenue department's work on the second day! | दुसºया दिवशीही महसूल विभागाचे कामकाज ठप्प !

दुसºया दिवशीही महसूल विभागाचे कामकाज ठप्प !

ठळक मुद्देकर्मचाºयांचा संप सुरूच नागरिकांची गैरसोय

वाशिम : विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महसूल कर्मचारी संघटनेने १० आॅक्टोबरपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात दुसºया दिवशीही वाशिम जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी व पदोन्नत नायब तहसीलदार सहभागी झाल्याने महसूलचे कामकाज ठप्प पडले आहे. 

पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक पद सरळसेवेने भरल्यास महसुल विभागातील अव्वल कारकुन दर्जाचे कर्मचाºयावर अन्याय होणार असून अनेक अव्वल कारकुन संवर्गातील कर्मचारी यांना पदावनत व्हावे लागणार आहे. त्यामुळे पुरवठा विभागाचे परिपत्रकान्वये दिलेल्या पदभरतीच्या सुचनेला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य महसुल कर्मचारी संघटनेने केली आहे. याशिवाय कनिष्ठ लिपिक पदनाम बदलून महसूल सहाय्यक करणे, सेवानिवृत्तीचे वय ५८ वरुन ६० करणे, जुनी पेंशन योजना लागू करणे, पुरवठा निरीक्षक हे पद सरळसेवेने न भरता पदोन्नतीने भरणे, सातवा वेतन आयोग लागू करणे, ५ दिवसाचा आठवडा करणे, अव्वल कारकून संवर्गाची वेतन त्रुटी दूर करणे, आकृतीबंधाबाबत सकारात्मक निर्णय घेणे, शिपाई संवर्गातून तलाठी संवर्गात पदोन्नती तात्काळ देणे आदी मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महसूल कर्मचारी कामबंद आंदोलनावर गेले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालयातील कर्मचारी संपावर असल्याने कार्यालयात शुकशुकाट दिसून येत आहे. ग्रामीण भागातून कामानिमित्त येणाºया नागरिकांना खाली हात परत जावे लागले. दुसºया दिवशीही सर्व महसूल कर्मचारी संपावर असून, संप १०० टक्के यशस्वी होत असल्याचा दावा महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विशाल डुकरे यांनी केला.

Web Title: Revenue department's work on the second day!