सेवानिवृत्त शिक्षकांचे वेतन रखडले!
By Admin | Updated: April 25, 2017 01:48 IST2017-04-25T01:48:00+5:302017-04-25T01:48:00+5:30
रिसोड- ऐन लग्नसराईच्या काळात वेतन मिळाले नसल्याने विविध अडचणींचा सामोरे जावे लागत असल्याचा पाढा सेवानिवृत्त शिक्षकांनी प्रशासनासमोर वाचला.

सेवानिवृत्त शिक्षकांचे वेतन रखडले!
रिसोड : गत दोन महिन्यांपासून रिसोड तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षकांना वेतन मिळाले नाही. ऐन लग्नसराईच्या काळात वेतन मिळाले नसल्याने विविध अडचणींचा सामोरे जावे लागत असल्याचा पाढा सेवानिवृत्त शिक्षकांनी प्रशासनासमोर वाचला.
उतरत्या वयात आर्थिक गरजा भागविण्यासाठी शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतन दिले जाते. सेवानिवृत्त शिक्षकांनादेखील निवृत्त वेतन मिळत असून, या शिक्षकांना नियमित वेतन मिळत नाही. गत दोन महिन्यांचे वेतन रखडले आहे. औषधोपचार आणि दैनंदिन गरजा आदींचा खर्च उधारीवर करावा लागत आहे. लग्नसराईचा महिना असल्यामुळे पैशाची चणचण भासत आहे. येत्या ३० एप्रिलपर्यंत वेतन अदा करावे, अशी मागणी सेवानिवृत्त शिक्षक संघटना रिसोडचे उपाध्यक्ष अंकुशराव सोनुने व सचिव सखाराम नोमडे यांनी सोमवारी केली.
तसेच सेवानिवृत्त शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी सेवानिवृत्त शिक्षकांची सहविचार सभा १ मे रोजी रिसोड पंचायत समिती कार्यालयात सकाळी १० वाजता ठेवण्यात आल्याची माहिती संघटनेचे उपाध्यक्ष अंकुशराव सोनुने व सचिव सखाराम नोमडे यांनी दिली आहे.