मॅरेथॉन स्पर्धेला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:23 IST2021-02-05T09:23:44+5:302021-02-05T09:23:44+5:30
परिसरात प्रथमच अशा प्रकारचे आयोजन विकास कोंगे व त्यांचे सहकारी मित्र यांच्यावतीने घेण्यात आले. हे स्पर्धा फक्त ...

मॅरेथॉन स्पर्धेला प्रतिसाद
परिसरात प्रथमच अशा प्रकारचे आयोजन विकास कोंगे व त्यांचे सहकारी मित्र यांच्यावतीने घेण्यात आले. हे स्पर्धा फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी घेण्यात येत होत्या, परंतु आज या छत्रपती फाउंडेशनच्यावतीने हे सर्व नियोजन गोगरी या गावांमध्ये सुद्धा यशस्वीरीत्या त्यांनी पार पाडले त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन पांडुरंग कोठाळे यांनी धावपटूंना झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात करुन दिली. आणि विशेष बाब म्हणजे या स्पर्धेला अमरावती ,हिंगोली ,नांदेड या , मोठ्या शहरांतून स्पर्धकांनी भागत घेतला हाेता. बक्षीस वितरण जि. प. सदस्य दौलतराव इंगोले , पांडुरंग कोठाळे, अतुल गायकवाड, माजी पं. स. सभापती सुभाष शिंदे, माजी सैनिक शंकरराव कोंगे यांच्या हस्ते करण्यात आले . तसेच मुरलीधर बेंगाळ यांच्यावतीने पहिल्या वीस खेळाडूंना मेडल प्रदान करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत पं. स. सदस्य गणेश पवार , भारत कोंगे, राम बोथे, नंदू पावशे, सुभाष साखरे, वसुदेव बोथे, श्याम बोथें , गणेश बोथे, अमोल बोथे, शिवचरण शिंदे ,कैलास बेंगाळ, रवी गिरी, निलेश जाधव, दीपक कोंगे, मंगेश शिंदे ,दीपक जाधव, अरुण राऊत, व समस्त गावकरी मंडळी व परिसरातील प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.