प्रकल्पांचा जलसाठा घसरला !

By Admin | Updated: April 18, 2015 01:53 IST2015-04-18T01:53:55+5:302015-04-18T01:53:55+5:30

वाशिम जिल्ह्यातील तीन मध्यम प्रकल्पात १८ तर शंभर लघुप्रकल्पात १५ टक्के जलसाठा.

Reservoirs of the projects dropped! | प्रकल्पांचा जलसाठा घसरला !

प्रकल्पांचा जलसाठा घसरला !

वाशिम : पावसाळय़ात झालेल्या अत्यल्प पावसामुळे पाण्याची पातळी आधीच कमी होती. गत दोन महिन्यांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे पाण्याच्या पा तळीत वाढ न होता शेतकर्‍यांचे नुकसानच मोठय़ा प्रमाणात झाले आहे. प्रकल्पांमध्ये व धरणामध्येही जलसाठा कमी असल्याने जिल्हय़ात पाणीटंचाईची शक्यता नाकारता येत नाही. जानेवारी महिन्यात मध्यम प्रकल्पात २५.९६ टक्के जलसाठा होता आजच्या घडीला (१५ एप्रिल) तो १८.४१ टक्क्यावर आला आहे. जिल्ह्यातील १0३ मध्यम व लघू प्रकल्पातील जलसाठा पाहता पाण्याची मोठी टंचाई निर्माण होण्याची शक्यता असून, काही भागात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यातील १00 लघू प्रकल्पांपैकी ४ प्रकल्पाची जलाशय पातळी लघुत्तम जलाशय पातळी आहे, तर १४ प्रकल्प कोरडे ठण्ण पडले आहेत. २९ प्रकल्पाची जलाशय पातळी लघुत्तम पातळीच्या खाली गेली आहे. केवळ एक मध्यम व ४ लघुप्रकल्पाचा उपयुक्त जलसाठा ५0 टक्केपेक्षा जास्त असल्याची लघू पाटबंधारे विभाग वाशिम जलाशय पातळी अहवालात नोंद आहे. जिल्हय़ात असलेल्या ३ मोठय़ा प्रकल्पामध्ये आजच्या घडीला १७.७0 दलघमी जलसाठा आहे तर १00 लघू प्रकल्पामध्ये ३५.८८ दलघमी असा एकूण ५३.५८ टक्के जलसाठा आहे. जिल्हय़ातील मध्यम प्रकल्पापैकी एकबुर्जी प्रकल्पात १९.३0, सोनल प्रकल्पात २७.९६ तर अडाण प्रकल्पात १५.८५ टक्के तर १00 लघू प्रकल्पा पेैकी २८ प्रकल्पांमध्ये १५ टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा आहे. प्रकल्पात जलसाठय़ांची स्थिती दयनीय असल्याने पाणीटंचाईची दाट शक्यता दिसून येत आहे. भूगर्भातील जलस्तर घटता आहे. त्याचबरोबर वाशिम जिल्ह्या तील तीन मध्यम व १00 लघू प्रकल्पात मिळून केवळ आजपर्यंत १५ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. गावागावात पाणी टंचाई जाणवत असून, पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.

Web Title: Reservoirs of the projects dropped!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.