कोरोना योद्ध्यांसाठी ऑक्सिजनचे १५ टक्के बेड आरक्षित ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:38 IST2021-04-26T04:38:00+5:302021-04-26T04:38:00+5:30

वाशिम : कोविड-१९ विरुद्धच्या लढ्यात लढणाऱ्या आरोग्य कर्मचारी व अधिकारी तसेच त्याच्या कुटुंबांसाठी १५ टक्के ऑक्सिजन बेड आरक्षित ठेवावे, ...

Reserve 15 percent oxygen beds for corona warriors | कोरोना योद्ध्यांसाठी ऑक्सिजनचे १५ टक्के बेड आरक्षित ठेवा

कोरोना योद्ध्यांसाठी ऑक्सिजनचे १५ टक्के बेड आरक्षित ठेवा

वाशिम : कोविड-१९ विरुद्धच्या लढ्यात लढणाऱ्या आरोग्य कर्मचारी व अधिकारी तसेच त्याच्या कुटुंबांसाठी १५ टक्के ऑक्सिजन बेड आरक्षित ठेवावे, अशी मागणी आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या जिल्हा शाखेतर्फे करण्यात आली.

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, गत वर्षभरापासून आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, आशा वर्कर व कोरोना योद्ध्यांना जिल्ह्यात ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नाहीत. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आपल्या जीवाची पर्वा न करता आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी व अन्य सहकारी दिवस-रात्र काम करीत आहेत. या लढ्यात काम करताना कोरोना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे कोविड-१९ च्या लढ्यात अविरत सेवा देणाऱ्या आरोग्य कर्मचारी व अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांकरिता १५ टक्के ऑक्सिजन बेड आरक्षित ठेवावे व तसे आदेश जारी करावेत, अशी मागणी आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेने केली आहे. आरोग्य कर्मचारी, अधिकाऱ्यांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर ऑक्सिजन बेड मिळविण्यासाठी धडपड करावी लागते.

Web Title: Reserve 15 percent oxygen beds for corona warriors