वनोजा येथे विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:23 IST2021-02-05T09:23:19+5:302021-02-05T09:23:19+5:30
वनोजा येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर जयस्तंभावर प्रशासक लुंगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, याप्रसंगी ग्रामपंचायतचे माजी पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, सदस्यगण ...

वनोजा येथे विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन
वनोजा येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर जयस्तंभावर प्रशासक लुंगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, याप्रसंगी ग्रामपंचायतचे माजी पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, सदस्यगण तसेच नवनिर्वाचित सदस्यगण, ग्राविअ राठोड, कर्मचारी अनिल वाघमारे, तलाठी पांडे, तलाठी घायाळ, त्याच बरोबर प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थींनी, एनसीसी पथक उपस्थित होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत डाॅ. भालचंद्र राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी शाखाधिकारी पवार यांच्यासह कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. प्राथमिक आरोग्य केंद्रात येथील ध्वजारोहण जि.प.सदस्या नंदाबाई डोफेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डाॅ. विजय काळे व आरोग्य केंद्राचे कर्मचारी, एनसीसी पथक,वाइल्ड लाईफ टीमचे सदस्य उपस्थित होते. पशुचिकित्सालय केंद्रात पं.स. सदस्य गोविंदराव चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी पशू पर्यवेक्षक डॉ. गोडघासे उपस्थित होते. जि.प. प्राथमिक केंद्र शाळेत सेवानिवृत्त मुख्याध्यापक मधुकरराव राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, प्रभारी मुख्याध्यापक वानखडे, शिक्षक उपस्थित होते. शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात सेवानिवृत्त मुख्याध्यापक मधुकरराव राऊत यांनी ध्वजारोहण केले. यावेळी विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक एस.आर. राठोड, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. श्रीमती साळुंकाबाई राऊत कला व वाणिज्य महाविद्यालयात संस्थेच्या अध्यक्ष कमलाबाई राऊत यांनी ध्वजारोहण केले. यावेळी संस्थेचे संचालक मंडळ तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.देवेंद्र गावंडे, प्राध्यापक, व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सेवा सहकारी संस्थेत सभापती अविनाश राऊत यांचे ध्वजारोहण हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे संचालक, व्यवस्थापक चौधरी व सदस्य उपस्थित होते.