पार्डी टकमोर येथे प्रजासत्ताक दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:23 IST2021-02-05T09:23:24+5:302021-02-05T09:23:24+5:30
---- ज्ञानेश्वर माउली विद्यालय, कोंडाळा कोंडाळा महाली: येथील ज्ञानेश्वर माउली विद्यालय व मनोहरराव नाईक कनिष्ठ महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा ...

पार्डी टकमोर येथे प्रजासत्ताक दिन साजरा
----
ज्ञानेश्वर माउली विद्यालय, कोंडाळा
कोंडाळा महाली: येथील ज्ञानेश्वर माउली विद्यालय व मनोहरराव नाईक कनिष्ठ महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उदयसिंग राठोड, तर प्रमुख पाहुणे म्हणून शालीग्राम लगड यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष रामधन राठोड, सचिव विजय चव्हाण, मुख्याध्यापक तथा प्राचार्य डी. यू. कव्हर, सुदाम राठोड, रामभाऊ भिसे, भारत चव्हाण, गजानन गावंडे, संतोष गावंडे यांची उपस्थिती होती.
---------
जि.प. शाळा, कोंडाळा
कोंडाळा महाली: येथील जिल्हा परिषद वरिष्ठ शाळेसह ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालयात सीमा आघम यांच्या हस्ते, तर जि.प. शाळेत शाळा समिती अध्यक्ष पंजाब आघम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी तलाठी वसंता राठोड, पो.कॉ. चव्हाण, सेवानिवृत्त पोलीस वसंता जाधव, माजी सरपंच हरिभाऊ गावंडे, ग्रा.पं. सदस्य मीराबाई गावंडे, प्रभूसिंग पवार, ज्ञानेश्वर गावंडे, रामेश्वर गावंडे, सरदार चव्हाण, कुंडलिक चव्हाण, वीरेंद्र चव्हाण, सुनील चव्हाण आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक मुख्याध्यापक भानुदास महाले, सूत्रसंचालन स. शिक्षक गजानन डांगे, आभार प्रदर्शन नरेंद्र सरनाईक यांनी केले. यशस्वीतेसाठी शिक्षक संदीप मुसळे, वर्षा गावंडे यांनी परिश्रम घेतले.