श्रमदानातुन पाईपलाईनची केली दुरुस्ती; सिंगडोह सिंगणापूर ग्रामस्थांचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 14:13 IST2018-02-13T14:11:46+5:302018-02-13T14:13:26+5:30
ग्राम सिंगडोह सिंगणापुर येथे सामकी माता संस्थान समोरील सार्वजनिक पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने प्रचंड पाणी साचत होते.

श्रमदानातुन पाईपलाईनची केली दुरुस्ती; सिंगडोह सिंगणापूर ग्रामस्थांचा उपक्रम
साखरडोह - येथुन जवळच असलेल्या ग्राम सिंगडोह सिंगणापुर येथे सामकी माता संस्थान समोरील सार्वजनिक पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने प्रचंड पाणी साचत होते. त्यातच सेवालाल महाराज जयंतीनिमित्त सिंगणापुर येथे भागवत सप्ताहाचे व यात्रेचे आयोजन केले आहे. त्यामुळे सांडलेल्या पाण्याचा नागरीकांना त्रास होत होता. ही बाब गावाचे युवा सरपंच अभिजीत मनवर यांच्या लक्षात येताच त्यांनी ग्रामपंचायत सदस्य व युवकांना सोबत घेवुन ही फुटलेली पाईपलाईन श्रमदानातुन दुरुस्त करुन घेतली.
गावातील युवक व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी सहकार्य करत फुटलेले दोन पाईप व लिकीज दुरुस्त करुन त्यावर सिमेंट कॉक्रीटचा माल भरुण भविष्यात कधी फुटणार नाही अशी व्यवस्था करुन ठेवली आहे. यामुळे भाविकाना भागवत ऐकतांना किंवा चालतांना होणारा त्रास कायमचा बंद झाला ,यासाठी तांड्याचे नायक कारभारी यांनी सरपंच अभिजीत मनवर, उपसरपंच चरण महाराज,अमरसिंग चव्हाण, पांडूरंग राठोड, सुभाष राठोड,भुषण मानकर, महेंद्र चौधरी, प्रकाश फांदळे, विनोद चव्हाण, योगेश भगत, सुरेश राठोड, नितेश मनवर, रामविलास राठोड, दिलीप चव्हाण यांचे आभार व्यक्त करत युवक व ग्रामस्थांनी समोर येवुन गाव स्वच्छ व सुंदर होण्यास वेळ लागणार नाही अशी प्रतिक्रिया दिली.