शिरपूर येथील पाइपलाइनची दुरुस्ती, पाणीपुरवठा सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:41 IST2021-07-31T04:41:42+5:302021-07-31T04:41:42+5:30
शिरपूर गावात २०१२ पूर्वी नादुरुस्त नळयोजनेमुळे तीव्र पाणीटंचाई होती. तत्कालीन जि.प. सदस्य इमदाद बागवान यांनी विशेष प्रयत्न करून पाणीटंचाई ...

शिरपूर येथील पाइपलाइनची दुरुस्ती, पाणीपुरवठा सुरळीत
शिरपूर गावात २०१२ पूर्वी नादुरुस्त नळयोजनेमुळे तीव्र पाणीटंचाई होती. तत्कालीन जि.प. सदस्य इमदाद बागवान यांनी विशेष प्रयत्न करून पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत ४.८९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. पुढे या योजनेमुळे गावातील पाणीटंचाई संपुष्टात आली. मात्र, केलेल्या कामात असलेल्या त्रुटी किंवा अनियमिततेमुळे सतत पाइपलाइन लिकेज होण्याच्या घटना घडून पाणीपुरवठा ठप्प होतो. असाच प्रकार होऊन मागील २० दिवसांपूर्वी घडल्याने गावात भर पावसाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाली होती. वाघी, खंडाळादरम्यान अडोळ प्रकल्पाजवळील मोठ्या नाल्यात पाइपलाइन लिकेज झाली होती. सतत प्रयत्न करूनही दुरुस्तीचे काम करणे शक्य होत नव्हते.
-------------
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून प्रयत्नांची पराकाष्ठा
पाइपलाइन लिकेज झाली असताना नाल्यात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने ती दुरुस्त करणे कठीण झाले होते. अशात ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी नाल्यात उतरून दुरुस्ती कामासाठी प्रयत्न केले आणि यामध्ये त्यांना यश प्राप्त झाले. शुक्रवारपासून शिरपूर येथील पाणीपुरवठा सुरळीत झाला असल्याची माहिती सरपंच पती संतोष अढागळे यांनी दिली.