लोकसहभागातून पाणंद रस्त्याची डागडुजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:42 IST2021-02-16T04:42:03+5:302021-02-16T04:42:03+5:30

-- द्रुतगती मार्गावर खड्डे; अपघाताची भीती शेलूबाजार : नागपूर-औरंगाबाद द्रुतगती महामार्गावर लाठी गावानजीक पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवासी व ...

Repair of Panand road through public participation | लोकसहभागातून पाणंद रस्त्याची डागडुजी

लोकसहभागातून पाणंद रस्त्याची डागडुजी

--

द्रुतगती मार्गावर खड्डे; अपघाताची भीती

शेलूबाजार : नागपूर-औरंगाबाद द्रुतगती महामार्गावर लाठी गावानजीक पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवासी व वाहनधारक त्रस्त झाले आहेत. या मार्गावर वाहन चालविताना चालकांना कसरत करावी लागत आहे. यामुळे अपघाताची भीती निर्माण झाली आहे.

----

विकासकामासाठी करवसुलीवर भर

धनज बु.: ग्रामस्थांना सोयीसुविधा उपलब्ध करण्याच्या उद्देशाने विकासकामे करण्यासाठी निधीची गरज आहे. त्यामुळे कारंजा तालुक्यातील ग्रामविकास अधिकाऱ्यांनी करवसुलीवर भर दिला आहे. त्यानुसार थकीत करधारकांना ग्रामपंचायतकडून मागणीपत्र देण्यात येत आहे.

---

कामरगावात रस्त्यावर उकिरडे

उंबर्डा बाजार : कारंजा तालुक्यातील उंबर्डा बाजार येथे रस्त्यावरच उकिरडे तयार झाले आहेत. या उकिरड्यांमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. हे उकिरडे साफ करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: Repair of Panand road through public participation