जिल्हा रुग्णालयातील अंतर्गत रस्त्यांची दुरूस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:15 IST2021-03-13T05:15:40+5:302021-03-13T05:15:40+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालयातील अंतर्गत रस्त्याची दुरवस्था झाल्याने वयोवृद्ध, अपघातग्रस्त तसेच गंभीर रुग्णांना उपचारासाठी वाहनातून घेऊन येताना अडचणींचा सामना करावा ...

जिल्हा रुग्णालयातील अंतर्गत रस्त्यांची दुरूस्ती
जिल्हा सामान्य रुग्णालयातील अंतर्गत रस्त्याची दुरवस्था झाल्याने वयोवृद्ध, अपघातग्रस्त तसेच गंभीर रुग्णांना उपचारासाठी वाहनातून घेऊन येताना अडचणींचा सामना करावा लागत होता. तसेच या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाळ्यात पाणी जमा होऊन चिखल होत असल्याने रुग्णांची गैरसोय होत होती. त्यामुळे रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी रुग्णालयात येणारे रुग्ण व नातेवाईकांकडून गेल्या काही दिवसांपासून केली जात होती. यासंदर्भात ‘लोकमत’नेही वृत्ताच्या माध्यमातून प्रश्नाला वाचा फोडली. दरम्यान, जिल्हा वार्षिक योजना २०२०-२१ मधून जिल्हा रस्ते दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिशय कमी कालावधीत रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम पूर्ण केले. रुग्णालयातील ‘पेव्हर ब्लॉक’ व शवविच्छेदनगृहाच्या दुरुस्तीसाठीदेखील जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, हे कामही लवकरच पूर्ण होईल, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली.