धानोरा-शेंदुरजना रस्त्याची दूरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:42 IST2021-07-30T04:42:51+5:302021-07-30T04:42:51+5:30
^^^^^^^^^^ २८ वर्गखोल्या नादुरूस्तच वाशिम : कोरोना संसर्गामुळे यंदाही प्राथमिक शाळा भरल्या नाहीत. त्यामुळे यंदा वर्गखोल्यांची दुरूस्ती तातडीने करून ...

धानोरा-शेंदुरजना रस्त्याची दूरवस्था
^^^^^^^^^^
२८ वर्गखोल्या नादुरूस्तच
वाशिम : कोरोना संसर्गामुळे यंदाही प्राथमिक शाळा भरल्या नाहीत. त्यामुळे यंदा वर्गखोल्यांची दुरूस्ती तातडीने करून विद्यार्थ्यांची संभाव्य गैरसोय टाळावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे. तथापि, २८ शाळांच्या वर्गखोल्यांच्या दुरुस्तीचे काम झाले नाही.
---------
अपुऱ्या संख्येमुळे पोलिसांवर ताण
वाशिम : अनिसंग पोलीस चौकीअंतर्गत परिसरातील २५पेक्षा अधिक गावांचा समावेश आहे. या गावांतील जनतेच्या सुरक्षेसाठी आवश्यक संख्येत पोलीस कर्मचारी नाहीत. त्यामुळे कार्यरत पोलिसांवर कायदा-सुव्यवस्था अबाधित राखताना ताण येत आहे.
----------
साथरोग टाळण्याचे प्रयत्न
वाशिम : गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत असल्याने गावागावांत गटारे साचली आहेत. त्यामुळे डासांसह जंतूसंसर्ग वाढून साथरोग पसरू नये, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांकडून ग्रामस्थांना आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात येत आहे. गेल्या आठवडाभरापासून हा उपक्रम सुरू आहे.
------
रोहित्राच्या दुरुस्तीला विलंब
वाशिम : तालुक्यातील अनेक ठिकाणचे रोहित्र आठवडाभरापासून नादुरुस्त आहे. त्यामुळे वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने ग्रामस्थांना त्रास होत आहे, परंतु हे रोहित्र दुरुस्त करण्यास विलंब होत आहे.
--------
पीक संरक्षणासाठी बांधबंदिस्ती
वाशिम : कामरगाव परिसरात खरीप पिकांवर वन्यप्राणी ताव मारून पिकांचे नुकसान करीत असल्याने शेतकऱ्यांनी बांधबंदिस्तीच्या कामाला वेग दिल्याचे चित्र गुरुवारी दिसून आले. पिकांवर वन्यप्राणी ताव मारत असल्याने शेतकरी वेतागून गेले आहेत.
---------
आसेगावातील जलस्रोतांच्या पातळीत वाढ
वाशिम : गतवर्षी उन्हाळ्यापूर्वीच जलस्रोत कोरडे पडल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. आता यंदा गत आठवड्यात आलेल्या पावसामुळे आसेगाव परिसरातील जलस्रोतांची पातळी वाढली आहे.
--------
अडोळ प्रकल्पातील पाण्याचा अपव्यय
वाशिम : अडोळ येथील अडाण प्रकल्पातून रिसोड शहरासह अनेक गावांना पाणीपुरवठा केला जातो. यावरील पाणीपुरवठा योजनेंतर्गतच्या व्हॉल्वला गळती लागल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. काही दिवसांपूर्वी या व्हॉल्वची दुरुस्ती केली होती.
-----------