किनगावराजा : येथून जाणाऱ्या मेहकर-जालना या मार्गावरील पुलावर कठड्याअभावी अनेक अपघात झाले आहेत. परंतु आता किनगावराजा पुलावर नुकतेच कठड्याच्या बांधकामाला सुरुवात झाल्यामुळे या भागातील शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना व इतर पादचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या पुलाची लांबी अंदाजे ५५ ते ६० मीटर आहे. तर पुलापासून वरती कठड्याची उंची चार फुटठेवण्यात आली आहे. दोन कॉलम मधील अंतर साधारणत: १ ते दिड मिटर असून, त्यामध्ये तीन पाईप ६० गेजचे ठेवण्यात आले आहेत. नदीपासून या पुलाची उंची ६ ते ७ मिटर आहे. त्यामुळे वाहनधारक प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
पुलाच्या कठड्यामुळे पादचाऱ्यांना दिलासा
By admin | Updated: April 11, 2017 20:16 IST