रिसोड आगाराच्या उत्पन्नात ३० लाखांची वाढ!

By Admin | Updated: May 30, 2017 01:42 IST2017-05-30T01:42:10+5:302017-05-30T01:42:10+5:30

रिसोड : रिसोड आगाराचे लग्नसराईत मागील वर्षापेक्षा यावर्षी मासिक उत्पन्न ३० लाखांनी वाढले असून, हंगाम एसटी महामंडळाचा हाउसफुल गेला आहे.

Reebok earnings increase by 30 lakh! | रिसोड आगाराच्या उत्पन्नात ३० लाखांची वाढ!

रिसोड आगाराच्या उत्पन्नात ३० लाखांची वाढ!

लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड : रिसोड आगाराचे लग्नसराईत मागील वर्षापेक्षा यावर्षी मासिक उत्पन्न ३० लाखांनी वाढले असून, हंगाम एसटी महामंडळाचा हाउसफुल गेला आहे.
चालू वर्षात लग्न सराईने धूम केल्याने एस.टी. महामंडळाचे मे महिन्याचे मासिक उत्पन्न १ कोटी ५० लाखांच्यावर पोहोचले आहे. मागील वर्षी उत्पन्न १ कोटी २० लाखाच्या आसपास होते. ते तुलनेमध्ये यावर्षी उत्पन्न ३० लाखांनी वाढले आहे, असे चित्र आहे. दरवर्षी लग्नसराईच्या हंगामामध्ये उत्पन्नाचा आकडा चढताच आहे. उत्पन्नाच्या बाबतीत रिसोड आगार नेहमीच अग्रेसर असते. विभागातून बहुताश वेळी क्रमांक मिळाला आहे, उत्पन्न वाढले; परंतु सुविधांचा अभाव मात्र प्रकर्षाने जाणवत आहे, हे विशेष. चालक वाहक व सहकारी यांच्या परिश्रमाचे फळ म्हणजे आर्थिक उत्पन्नाचे प्रमुख कारण असल्याचे मत आगार प्रमुख स्वप्नील अहिरे यांनी व्यक्त केले.

Web Title: Reebok earnings increase by 30 lakh!