प्रकल्पातील जलसाठ्यात घट; पाणीटंचाईची चाहूल !
By Admin | Updated: May 6, 2017 19:24 IST2017-05-06T19:24:55+5:302017-05-06T19:24:55+5:30
उर्ध्व मोर्णा प्रकल्पात सद्यस्थितीत १९ टक्क्याच्या आसपास जलसाठा शिल्लक असल्याने भविष्यात पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे.

प्रकल्पातील जलसाठ्यात घट; पाणीटंचाईची चाहूल !
मेडशी : मेडशी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व मोर्णा प्रकल्पात सद्यस्थितीत १९ टक्क्याच्या आसपास जलसाठा शिल्लक असल्याने भविष्यात पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे.
२०१४ आणि २०१५ च्या तुलनेत सन २०१६ च्या पावसाळ्यात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने प्रकल्पात बऱ्यापैकी जलसाठा होता. जिल्ह्यातील अन्य तालुक्याच्या तुलनेत मालेगाव तालुक्यात म्हणावा तसा समाधानकारक पाऊस झाला नव्हता. तथापि, मेडशी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व मोर्णा प्रकल्पात बऱ्यापैकी जलसाठा होता. सुरूवातीला या प्रकल्पाचे गेट नादुरूस्त असल्याने पाण्याचा अपव्यय झाला. त्यानंतर गेट दुरूस्त करण्यात आले. प्रकल्पातील पाण्याचा बेसुमार उपसा झाला. परिणामी आता प्रकल्पात १९ टक्क्याच्या आसपास जलसाठा शिल्लक राहिला. उन्हाळाभर मेडशीवासियांची तहान भागविण्यासाठी १९ टक्के जलसाठा हा पुरेसा ठरणारा नाही. प्रकल्पातील जलसाठ्यात कमालीची घट होत असल्याची बाब संभाव्य पाणीटंचाईची चाहूल देण्यास पुरेशी ठरत आहे.