राजस्थान महाविद्यालय रसायनशास्त्र प्रयोगशाळेस संशोधन केंद्र म्हणून मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:48 IST2021-09-24T04:48:21+5:302021-09-24T04:48:21+5:30

स्थानिक राजस्थान महाविद्यालयातील रसायनशास्त्र प्रयोगशाळेस संशोधन केंद्र म्हणून मान्यता मिळाली आहे. सतत तीन वेळ नैक द्वारा 'अ' दर्जा प्राप्त ...

Recognition of Rajasthan College Chemistry Laboratory as Research Center | राजस्थान महाविद्यालय रसायनशास्त्र प्रयोगशाळेस संशोधन केंद्र म्हणून मान्यता

राजस्थान महाविद्यालय रसायनशास्त्र प्रयोगशाळेस संशोधन केंद्र म्हणून मान्यता

स्थानिक राजस्थान महाविद्यालयातील रसायनशास्त्र प्रयोगशाळेस संशोधन केंद्र म्हणून मान्यता मिळाली आहे.

सतत तीन वेळ नैक द्वारा 'अ' दर्जा प्राप्त राजस्थान आर्य महाविद्यालयामधील रसायनशास्त्र विभागातील प्रयोगशाळेला संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने संशोधन केंद्र म्हणून मान्यता बहाल केली आहे.यामुळे जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रसायनशास्त्र विषयात आचार्य (पीएच.डी.) पदवी मिळविण्याकरिता आता महाविद्यालयातच सुसज्ज अशा प्रयोगशाळेत संशोधन करता येणार आहे.

रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. आर. एफ. पगारिया यांनी प्रथम २०१८ मध्ये पीएच.डी.चे मार्गदर्शक म्हणून मान्यता मिळविली असून, त्यांच्या पुढाकाराने महविद्यालयातील रसायनशास्त्र विभागास संशोधन केंद्र म्हणून मान्यता मिळाली. यामुळे आता आचार्य पदवीकरिता विद्यार्थ्यांना विशेष अशी व्यवस्था उपलब्ध झालेली आहे. सध्यस्थितीत संशोधन केंद्राला विद्यापीठाने ५ संशोधक विद्यार्थ्यांसाठी प्रा. डॉ. रमेश पगारिया यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. प्राचार्य व संस्थेचे अध्यक्ष, सचिव तथा सर्व संचालक मंडळ सदस्यांनी विभागप्रमुखाचे कौतुक केले.

Web Title: Recognition of Rajasthan College Chemistry Laboratory as Research Center