वाशिम जिल्हयातील १.३८  लाख विद्यार्थ्यांसाठी ५.२५ लाख पाठ्यपुस्तके प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 01:54 PM2018-06-10T13:54:02+5:302018-06-10T13:54:02+5:30

जिल्हयातील १.३८ लाख विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक शिक्षण विभागाने ७.५४ लाख मोफत पाठयपुस्तकांची मागणी वरिष्ठांकडे नोंदविली असून, आतापर्यंत ५ .२५ लाख पुस्तके प्राप्त झाली आहेत.

Receive 5.25 lakh textbooks for 1.38 lakh students in Washim district | वाशिम जिल्हयातील १.३८  लाख विद्यार्थ्यांसाठी ५.२५ लाख पाठ्यपुस्तके प्राप्त

वाशिम जिल्हयातील १.३८  लाख विद्यार्थ्यांसाठी ५.२५ लाख पाठ्यपुस्तके प्राप्त

Next
ठळक मुद्दे इयत्ता पहिले ते आठवीतील सर्व माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकाचे वितरण केले जाते. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने विद्यार्थी संख्येनुसार सात लाख ५४ हजार १६ पाठ्यपुस्तकां ची मागणी नोंदविली होती. आतापर्यंत जिल्ह्याला ५.२५ लाख पाठ्यपुस्तके प्राप्त झाली असून,  संबंधित पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाºयांकडे सुपूर्द करण्यात आली आहे.

वाशिम : शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व अनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिले ते आठवीतील सर्व माध्यमाच्या शिक्षण घेणाºया वाशिम जिल्हयातील १.३८ लाख विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक शिक्षण विभागाने ७.५४ लाख मोफत पाठयपुस्तकांची मागणी वरिष्ठांकडे नोंदविली असून, आतापर्यंत ५ .२५ लाख पुस्तके प्राप्त झाली आहेत. या पाठ्यपुस्तकांचे वितरण शाळेच्या पहिल्या दिवशी उपस्थित विद्यार्थ्यांना केले जाणार आहे. 

वाशिम जिल्ह्यातील शाळा २६ जूनपासून सुरू होणार आहेत. विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती टिकविणे, गळतीचे प्रमाण शून्यावर आणणे, पाठ्यपुस्तकांपासून कुणीही वंचित राहू नये, पाठ्यपुस्तकांअभावी शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून समग्र शिक्षा अभियानातून  शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिले ते आठवीतील सर्व माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकाचे वितरण केले जाते. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने विद्यार्थी संख्येनुसार सात लाख ५४ हजार १६ पाठ्यपुस्तकां ची मागणी नोंदविली होती. यामध्ये कारंजा तालुक्यातील २१ हजार ७५२ विद्यार्थ्यांना एक लाख २० हजार ५९४ पाठ्यपुस्तके, मालेगाव तालुक्यातील २१ हजार २६९ विद्यार्थ्यांना एक लाख १३ हजार ९४० पाठ्यपुस्तके, मंगरूळपीर तालुक्यातील १८ हजार ६४० विद्यार्थ्यांना एक लाख २ हजार ३२७ पाठ्यपुस्तके, मानोरा तालुक्यातील १७ हजार ४७० विद्यार्थ्यांना ९२ हजार ७९९ पाठ्यपुस्तके, रिसोड तालुक्यातील २७ हजार ६३१ विद्यार्थ्यांना एक लाख ५१ हजार ६५२ पाठ्यपुस्तके तर वाशिम तालुक्यातील ३१ हजार ५९९ विद्यार्थ्यांना एक लाख ७२ हजार ३४४ पाठ्यपुस्तकांचे वाटप होणार आहे. आतापर्यंत जिल्ह्याला ५.२५ लाख पाठ्यपुस्तके प्राप्त झाली असून,  संबंधित पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाºयांकडे सुपूर्द करण्यात आली आहे. दरम्यान, यावर्षी इयत्ता पहिली व आठवीची पुस्तके बदलण्यात येणार असल्याने सदर पुस्तके उपलब्ध होण्याला वेळ लागणार आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी ही पुस्तके उपलब्ध होतील, असे सांगितले जात आहे.

Web Title: Receive 5.25 lakh textbooks for 1.38 lakh students in Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.