पोषण अभियानाला जनआंदोलनाचे स्वरूप देण्यासाठी सज्ज राहा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 14:46 IST2018-09-04T14:45:42+5:302018-09-04T14:46:10+5:30
पोषण अभियानांतर्गत महिनाभर राबवावयाच्या कार्यक्रम, उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.

पोषण अभियानाला जनआंदोलनाचे स्वरूप देण्यासाठी सज्ज राहा!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - जिल्ह्यामध्ये १ ते३० सप्टेंबरपर्यंत महिनाभर पोषण अभियान राबविण्यात येत असून या अभियानाला जनआंदोलनाचे स्वरूप देण्यासाठी सज्ज राहा, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी विभाग प्रमुखांसह गटविकास अधिकाºयांना दिल्या.
पोषण अभियानांतर्गत महिनाभर राबवावयाच्या कार्यक्रम, उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. विशेष ग्रामसभा, माहिती व प्रसिद्धी साहित्य वाटप, प्रभात फेरी, पोषण या विषयावर शाळेत चित्रपट दाखवणे, ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांचे वजन घेऊन छाननी करणे, ग्राम स्तरावर मुला-मुलींच्या जन्मदराचे फलक लावणे, बेटी बचाओ बेटी पढाओ, कृती आराखडा तयार करणे, मासिक पाळी व्यवस्थापन, ग्राम आरोग्य स्वच्छता व पोषण दिवस साजरा करणे, शाळा व अंगणवाडी केंद्रातील शौचालयासाठी पाणी सुविधा उपलब्ध करणे, अस्मिता योजने अंतर्गत सॅनिटरी नॅपकिन्सचा पुरवठा करणे, जिल्हास्तरावर पोषण मेळावे, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, पथनाट्य, शालेय निबंध स्पर्धा, प्रभात फेरी आदी आठवडानिहाय कार्यक्रमांची रुपरेषा मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांनी स्पष्ट केली. 
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार हा उपक्रम होत आहे. ग्रामविकास विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, माहिती व जनसंपर्क विभाग आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून सदर अभियान राबविण्यात येत आहे. अभियानासाठी आठवडानिहाय कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. याबाबतचे सादरीकरण महिला बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहूर्ले यांनी केले. या विविध उपक्रम आणि कार्यक्रमातून बालकांचे चांगले पोषण व्हावे या दृष्टीने मार्गदर्शन तसेच जनजागरण करावे, अशा सूचना मीना यांनी दिल्या. सर्व विभाग प्रमुखांसह गट विकास अधिकाºयांनी या मोहिमेत स्वत: पुढाकार घेऊन आपल्या अधिनस्त सर्व कर्मचाºयांमार्फत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिले. तालुका व ग्रामस्तरावर होणाºया विविध कार्यक्रमांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींचा सहभाग घेण्याबाबतदेखील मीना यांनी सूचना दिल्या.