शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

 राऊत परिवाराचा वसा; हनवतखेडावासियांना स्वखर्चाने पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 1:50 PM

मालेगाव :- तालुक्यातील हनवतखेडा येथील प्रगतिशील शेतकरी तथा खरेदी-विक्रीचे संचालक हरिदास किसनराव राऊत व  त्यांच्या पत्नी कमलाबाई राऊत हे मागील अनेक वर्षांपासून हनवतखेडा या गावाला मोफत पाणीपुरवठा करीत आहेत.

ठळक मुद्देहरीदास राऊत यांनी त्यांच्या शेतात असलेल्या १०० चौरस मीटर शेततळ्याचे पाणी मोटारपंपाच्या आधारे ग्रामपंचायतच्या पाईपलाईने गावात आणले. ग्रामपंचायत  किंवा पंचायत समितीकडून किंवा सरकारकडून कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता ते व त्यांच्या पत्नी गावाला पाणीपुरवठा करत आहेत.लग्न समारंभ व इतर कार्यक्रमांना सुद्धा त्यांच्याच शेतातून मोफत पाणीपुरवठा करण्यात येतो.

मालेगाव : तालुक्यातील हनवतखेडा येथील प्रगतिशील शेतकरी तथा खरेदी-विक्रीचे संचालक हरिदास किसनराव राऊत व  त्यांच्या पत्नी कमलाबाई राऊत हे मागील अनेक वर्षांपासून हनवतखेडा या गावाला मोफत पाणीपुरवठा करीत आहेत. ग्रामस्थांची तहान भागवून समाजसेवा करण्याचा वसाच त्यांनी घेतला आहे.हनवतखेड्यात ४५ टक्के आदिवासी, ४५ टक्के बौद्ध व १० टक्के मराठा, असे धार्मिक लोकसंख्येचे प्रमाण आहे. या गावातील ग्रामपंचायतची विहिर दरवर्षी उन्हाळ्यात कोरडी पडते. त्यामुळे ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. अशात हरीदास राऊत यांनी त्यांच्या शेतात असलेल्या १०० चौरस मीटर शेततळ्याचे पाणी मोटारपंपाच्या आधारे ग्रामपंचायतच्या पाईपलाईने गावात आणले आणि ग्रामस्थांची तहान भागविणे सुरू केले. त्यांच्याकडून संपूर्ण गावाला दररोज पाणीपुरवठा करण्यात येतो. विशेष म्हणजे ग्रामपंचायत  किंवा पंचायत समितीकडून किंवा सरकारकडून कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता ते व त्यांच्या पत्नी गावाला पाणीपुरवठा करत आहेत, तसेच आपल्या स्वत:च्या घरील कूपनलिकेतूनही रोज सकाळी सात ते दहा या वेळेत त्यांची पत्नी कमलाबाई राऊत ह्या स्वत: उभे राहून सर्व महिलांना समप्रमाणात मोफत पाणीपुरवठा करतात हे कार्य त्यांचे मागील ५ वर्षांपासून अविरत चालू असून शेवटपर्यंत करणार असल्याचे त्यांनी मनोदय व्यक्त केला. त्यामध्ये ते शेवटपर्यंत कुठलीही सरकारची आर्थिक मदत न घेता स्वखर्चातून गावकऱ्यांना पाणीपुरवठा वर्षानूवर्षे करणार असल्याचा मनोदय व्यक्त केला व तसेच काळामाथा येथील अवलिया महाराज संस्थान येथे सुद्धा त्यांच्या  शेतातून पाणी पुरवठा होत असून,  तिथे होत असलेले लग्न समारंभ व इतर कार्यक्रमांना सुद्धा त्यांच्याच शेतातून मोफत पाणीपुरवठा करण्यात येतो.

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांवWaterपाणी