प्रसूतिकाळात होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण निरंक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:28 IST2021-07-10T04:28:26+5:302021-07-10T04:28:26+5:30

महादेव घुगे भर जहांगीर : राष्ट्रीय आरोग्य अभियान उपक्रमासह सुरक्षित मातृत्वासाठी सरकारने जाहीर केलेल्या विविध योजना राबविण्यात आल्याने मातृत्वाचे ...

The rate of maternal mortality is negligible | प्रसूतिकाळात होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण निरंक

प्रसूतिकाळात होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण निरंक

महादेव घुगे

भर जहांगीर : राष्ट्रीय आरोग्य अभियान उपक्रमासह सुरक्षित मातृत्वासाठी सरकारने जाहीर केलेल्या विविध योजना राबविण्यात आल्याने मातृत्वाचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक मातांच्या प्रसूतिकाळात होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण गेल्या एक वर्षात निरंक ठेवण्याची मोप प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचारी वर्गाची ही किमया आजच्या मातृसुरक्षा दिनी उल्लेखनीय अशीच म्हणावी लागेल.

प्रसूतिपूर्व काळात घ्यावयाची काळजी, आहार व व्यायाम यांबाबत महिलांमध्ये जागृती करणे व त्यासाठी कार्यान्वित असलेल्या सरकारी योजनांचा प्रसार आरोग्य यंत्रणेकडून सुरू आहे. सदर योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांची प्रसूतीनंतर मिळणाऱ्या आर्थिक निधीऐवजी प्रसूतिपूर्व काळातील आहार व आरोग्याबाबत जाणीवजागृती होत आहे. यामुळेच हे शक्य झाले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

.............

वर्षभरात ८६ मातांची सुरक्षित प्रसूती

मागील एक वर्षामध्ये मोप प्राथमिक आरोग्य केंद्रासह, उपकेंद्रअंतर्गत सुमारे ७५ मातांची प्रसूती झाली, तर भर जहांगीर उपकेंद्रामध्ये २, वाकद उपकेंद्राअंतर्गत ३, चिंचाबाभर उपकेंद्र अंतर्गत ३, एकलासपूर उपकेंद्रअंतर्गत ३ अशा प्रकारे एकूण ८६ मातांचे सुखरूप बाळंतपण झाले. जोखमीच्या प्रसूतीतच मातांच्या जिवाला धोका असल्याने गर्भवतींना सातव्या महिन्यापासूनच आरोग्याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने आशा वर्करच्या माध्यमातून केले जात आहे. त्यामुळे माता मृत्यूचे प्रमाण रोखण्याला यश येत आहे.

..........

वर्षभरात सर्व प्रसूती रुग्णालयांतच

गेल्या वर्षभरात एकाही महिलेची प्रसूती घरात झाल्याची नोंद मोप प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दप्तरी नाही, ही गौरवाची बाब आहे. प्रसूतिवेदना सुरू झाल्यानंतर दुर्गम भागात वाहनव्यवस्था उपलब्ध होत नाही; त्यामुळे घरातच प्रसूती होते. यावेळी जंतुसंसर्ग होऊन अतिरक्तस्राव झाल्यास मातामृत्यूचा धोका वाढतो. मोप प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत सर्व आरोग्य सुविधा योग्य वेळी पोहोचविल्या जातात, असे वैद्यकीय अधिकारी डाॅ. आशिष सिंह यांनी सांगितले.

Web Title: The rate of maternal mortality is negligible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.