शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बंजारा समाजाचे धर्मगुरु रामराव महाराज यांचे पार्थिव पाेहरादेवीकडे रवाना; रविवारी हाेणार अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 16:35 IST

Sant Ramrao Maharaj News रविवारी पोहरादेवी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे गर्दी टाळण्यासाठी पाेहरादेवी येथे नाकाबंदी केल्या जात आहे. मुंबई येथून त्यांचे पार्थिव पाेहरादेवीकडे भाविकांसह नेले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानाेरा : संत सेवालाल महाराजांचे वंशज तथा बंजारा समाजाचे धर्मगुरु डॉ. रामराव महाराज यांचे मुंबई येथे  ३० ऑक्टाेबर राेजी रात्री ११ वाजताच्या सुमारास जगाचा निराेप घेतला. मुंबई येथून त्यांचे पार्थिव पहाटे ४ वाजता पाेहरादेवीकडे भाविकांसह नेले जात आहे. त्यांचे पार्थिव रात्री  ११ वाजेपर्यंत पाेहचणार असल्याचे राष्ट्रीय बंजारा परिषद मानाेऱ्याच्यावतिने कळविण्यात आले  आहे.बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामरावबापू महाराज यांची प्रकृती गेल्या वर्षभरापासून अस्थीर होती. श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने त्यांच्यावर मुंबई येथे लिलावती रुग्णालयात उपचारही करण्यात आले. गेल्या काही दिवसांपूर्वी ते मुंबई येथे गेले होते. त्यात कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी शुक्रवार ३० आॅक्टोबर रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर रविवारी पोहरादेवी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. ३१ ऑक्टाेबर राेजी पहाटे ४ वाजता डाॅ. रामराव महाराज यांचे पार्थिव मुुंबई येथून पाेहरादेवीकडे रवाना करण्यात आले आहे. वाशी नवी मुंबई येथे ६ वाजता, चाकण पुणे येथे ९ वाजता , नगर धाराशिव ११ वाजता , औरंगाबाद येथे दुपारी १ वाजता, जालना येथे सायंकाळी ४ वाजता , मेहकर येथे ६ वाजता, वाशिम येथे ८ वाजता , धानाेरा येथे रात्री १० वाजता मार्गक्रमण करीत रात्री ११ वाजता पाेहरादेवी येथे पार्थिव पाेहचणार आहे.  गर्दी टाळण्यासाठी पाेहरादेवी येथे नाकाबंदी केल्या जात आहे. पाेलीस विभागाचे पाेलीस पाटील यांना सहकार्याचे आवाहनमहान तपस्वी श्री संत रामराव महाराज यांचे काल रात्री निधन झाले त्यांचा त्यांचा अंत्यविधी ग्राम पोहरादेवी येथे रविवारी हाेणार आहे. या अंत्यविधी कार्यक्रमासाठी संपूर्ण देशातून परराज्यातील नागरिक येण्याची शक्यता टाळता येत नाही त्यामुळे आपल्याकडे तेवढा पोलीस बंदोबस्त उपस्थित नाही ,त्याकरिता  सर्व पोलीस पाटील यांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी ३१ ऑक्टाेबर दुपारून दोन वाजल्यापासून ते सोमवारपर्यंत बंदोबस्तकरिता मदत करण्याचे आवाहन मानाेरा पाेलीस स्टेशनचे ठाणेदार शिशिर मानकर यांनी केले आहे.

टॅग्स :Manoraमानोराwashimवाशिम