शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

सीएए, एनआरसी समर्थनार्थ वाशिममध्ये ‘हुंकार’; हजारो नागरिकांचा सहभाग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 2:53 PM

स्थानिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून हुंकार रॅलीला सुरूवात झाली.

ठळक मुद्दे ७०० पेक्षा अधिक महिला व एक हजार मीटर लांबीचा तिरंगा या रॅलीचे मुख्य आकर्षण ठरले. सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या ७० संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : नागरिकत्व दुरूस्ती कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरी नोंदणी (एनआरसी)च्या समर्थनार्थ राष्ट्रीय सुरक्षा मंचच्या वतीने शनिवार, ११ जानेवारी रोजी वाशिम शहरातील मुख्य मार्गावरून ‘हुंकार रॅली’ काढण्यात आली. या रॅलीत हजारो नागरिकांनी सहभाग घेतला. शेकडो फुट लांबीचा तिरंगा हे या हुंकार रॅलीचे मुख्य आकर्षण ठरले.स्थानिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून हुंकार रॅलीला सुरूवात झाली. पाटणी चौक, आंबेडकर चॉक, पोलिस स्टेशनमार्गे रॅलीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. या रॅलीत आमदार राजेंद्र पाटणी, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष राजू पाटील राजे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जुगलकिशोर कोठारी, हिंदू जनजागरण मंचचे प्रा. दिलीप जोशी, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष आशिष कोठारी, दयानंद सरस्वती महाराज, काकडे महाराज, गोपाल महाराज, सागर महाराज यांच्यासह इतर मान्यवरांनी प्रामुख्याने सहभाग नोंदविला. ७०० पेक्षा अधिक महिला व एक हजार मीटर लांबीचा तिरंगा या रॅलीचे मुख्य आकर्षण ठरले. हुंकार रॅलीच्या यशस्वीतेसाठी संतोष लक्रस, गणेश खंडाळकर, सागर चुंबळकर, नवीन शर्मा, कपील सारडा, रामा ठेंगडे, शंकर शेंडे, सुमीत ओझा यांच्यासह सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या ७० संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. सीएए या कायद्याविषयीचा गैरसमज दूर व्हावा, या कायद्याविषयी जनजागरण व्हावे, या उद्देशाने ही रॅली काढण्यात आली.

टॅग्स :washimवाशिमcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNational Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादी