The raising of the monkey; Pavilion set up for information center collapsed! | माकडांचा उच्छाद; माहिती केंद्रासाठी उभारण्यात आलेला मंडप कोसळला!
माकडांचा उच्छाद; माहिती केंद्रासाठी उभारण्यात आलेला मंडप कोसळला!


वाशिम : वाशिम शहरातील जूनी जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय या मतदान केंद्रात माकडांनी उच्छाद घातल्याने मतदारांसह कर्तव्यावर असलेले कर्मचारी त्रस्त दिसून आले. मतदारांना माहिती देण्यासंदर्भात उभारण्यात आलेल्या मंडपावर माकडाने उड्या मारल्याने तो कोसळला यावेळी येथे माहिती घेण्यासाठी १५ ते २० मतदार होते. कापडाचा मंडप असल्याने कोणताही अनुचित घटना घडली नाही. वाशिम येथील जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय या मतदान केंद्राच्या परिसरात मोठमोठी वृक्ष असल्याने माकडाचा कळप सकाळपासूनच दिसून आला. मतदार मतदान केंद्रात जात असतांना रस्त्यात असलेल्या माकडांमुळे मतदार भयभित झाले होते. अनेकदा कर्तव्यावर असलेल्या कर्मचाºयांनी त्यांना हाकलण्याचाही प्रयत्न केला. दुपारी १२ वाजेपर्यंत येथे माकडाच्या कळपांनी उच्छाद मांडला होता.


Web Title: The raising of the monkey; Pavilion set up for information center collapsed!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.