वाशिम जिल्ह्यात सर्वदूर पाऊस; पिकांना संजीवनी

By Admin | Updated: July 16, 2017 02:10 IST2017-07-16T02:10:14+5:302017-07-16T02:10:14+5:30

वाशिम जिल्ह्यातील सहाही तालुक्यांत शनिवारी जोरदार पाऊस झाला.

Rainfall in Washim district; Sanjivani for the crops | वाशिम जिल्ह्यात सर्वदूर पाऊस; पिकांना संजीवनी

वाशिम जिल्ह्यात सर्वदूर पाऊस; पिकांना संजीवनी

वाशिम : जिल्ह्यातील सहाही तालुक्यांत शनिवारी जोरदार पाऊस झाला. यामुळे खरीप हंगामातील संकटात सापडलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे.
मृग नक्षत्राच्या प्रारंभी झालेल्या समाधानकारक पावसामुळे बहुतांश शेतकर्‍यांनी पेरणीची कामे आटोपती घेतली होती. मात्र, गत २0 ते २५ दिवसांपासून पावसाने दीर्घ दडी मारल्यामुळे सर्वच पिके संकटात सापडली होती. काही ठिकाणी दुबार; तर कुठे तिबार पेरणी करावी लागली. अशात शनिवारी झालेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे.

Web Title: Rainfall in Washim district; Sanjivani for the crops